फासेपारध्यांच्या मुलांवरचा 'प्रश्नचिन्ह' मिटवणाऱ्या शिक्षकाची कहाणी

फासेपारध्यांच्या मुलांवरचा 'प्रश्नचिन्ह' मिटवणाऱ्या शिक्षकाची कहाणी

या शाळेचं नाव "प्रश्नचिन्ह" असलं तरी या शाळेनं तब्बल साडेचारशे अनाथ आणि फासेपारध्यांच्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणलंय.

  • Share this:

संजय शेंडे, अमरावती

27 आॅक्टोबर : अमरावतीत एका ध्येयवेड्या शिक्षकानं फासेपारध्यांच्या मुलांसाठी आश्रमशाळा सुरू केलीये. कोणतंही सरकारी अनुदान न घेता साडेचारशे मुलांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी एक शिक्षक धडपडतोय.

या शाळेचं नाव "प्रश्नचिन्ह" असलं तरी या शाळेनं तब्बल साडेचारशे अनाथ आणि फासेपारध्यांच्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणलंय. अमरावतीच्या मंगरुळ चव्हाळा इथं मतीन भोसले यांनी ही शाळा सुरू केलीये. सरकारच्या कोणत्याही अनुदानाशिवाय ही शाळा चालवण्याचं शिवधनुष्य मतीन यांनी पेललंय. सरकारनं शाळा देण्याचं आश्वासन दिलं, त्यातही फसवणूक झाली.

इथं शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची एक कहाणी आहे. या सगळ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी मतीन धडपड करतायेत.

प्रश्नचिन्ह शाळेत दर्जेदार शिक्षण मिळेल असा मतीन यांचा कटाक्ष असतो. या शाळांना पक्क्या भिंती नसल्या तरी त्यातून संस्कारक्षम पिढी घडेल हा त्यांचा आत्मविश्वास खूप काही सांगून जातो.

First published: October 28, 2017, 6:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading