असा होता 'प्लेबाॅय'कार, 5000 हून अधिक महिलांसोबत होते संबंध !

असा होता 'प्लेबाॅय'कार, 5000 हून अधिक महिलांसोबत होते संबंध !

हेफनर आपल्या घरात आलेल्या प्रत्येक मुलीचा फोटो काढून ठेवत होते. एवढंच नाहीतर ते एक डायरी सुद्धा लिहीत होते. यात त्यांनी आपलं कुणासोबत अफेअऱ सुरू आहे याची माहिती लिहुन ठेवली होती.

  • Share this:

28 सप्टेंबर : प्लेबाॅय मासिकाचे संस्थापक ह्यूज हेफनर यांनी जगाचा निरोप घेतलाय. पण हेफनर यांचं आयुष्यही रंजक होतं.  हेफनर आपल्या घरात आलेल्या प्रत्येक मुलीचा फोटो काढून ठेवत होते. एवढंच नाहीतर ते एक डायरी सुद्धा लिहीत होते. यात त्यांनी आपलं कुणासोबत अफेअऱ सुरू आहे याची माहिती लिहुन ठेवली होती. एका अहवालानुसार तब्बल 5000 पेक्षा जास्त महिलांसोबत त्यांचे संबंध होते.

- हेफनर यांचा आयक्यू लेव्हल 152 होता. ते मनोविज्ञानाचे विद्यार्थी होते. चार वर्षांचा अभ्यासक्रम त्यांनी अवघ्या 2.5 अडीच वर्षातच पूर्ण केला.

- हेफनर यांनी एमएची पदवीसाठी फक्त एकाच सेमिस्टरपर्यंत अभ्यास केला होता. या दरम्यान त्यांनी  'सेक्स बिव्हेवियर इन द यूएस लॉ' नावाचा पेपर लिहिला. या पेपरसाठी त्यांनी Aग्रेड मिळालं होतं. पण पेपराच्या निष्कर्षामुळे समाधानी न झाल्यामुळे सुपरवाइझरने B ग्रेड दिला.

- हेफनर अमेरिकेच्या सैन्यात सुद्धा भऱती झाले होते. त्यानंतर त्यांनी काॅलेजमध्ये प्रवेश घेतला. एका पब्लिशिंग इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना त्यांना प्लेबाॅय सुरू करण्याची आयडिया आली.

- प्लेबाॅय मासिक सुरू करण्यासाठी हेफनर यांच्याकडे पैसे नव्हते तेव्हा त्यांनी बँकेकडून कर्ज आणि आईकडून 1000 डाॅलर घेतले होते. यात त्यांनी मासिकाला सुरुवात केली.

- 1953 ला हेफनर यांनी प्लेबाॅय लाँच केलं. सुरुवातीला हे फक्त पुरुषांसाठी होतं. यात महिलांचे न्यूड फोटोसोबत लेख, मुलाखती आणि फिक्सन स्टोरीज छापले जात होते.

- पहिल्याच अंकात मर्लिन मुनरोचं न्यूड फोटो छापून एकच धुमाकूळ घातला होता.

- गंमतीची बाब म्हणजे मासिकाच्या सब्सक्रिप्शनसाठी पादरी आणि चर्चच्या अधिकाऱ्यांना विशेष सूट दिली होती. लोकांनी मासिकातील छापलेले न्यूड फोटोवर चर्चा करावी हा एकमेव हेतू होता.

- जेव्हा 1960 मध्ये अमेरिकेत वर्णभेदाचा वाद पेटला होता तेव्हा हेफनर यांनी शिकागोमध्ये पहिले प्लेबाॅय क्लब सुरू केला. या क्लबमध्ये वर्णभेदभाव केले जाणार नाही असं हेफनर यांनी जाहीर करून सर्वांना निमंत्रण दिलं.

- प्रसिद्ध प्लेबाॅय मेंशन हे लाॅस एंजेलिस मध्ये नसून शिकागोमध्ये आहे. शिकागो हाऊसमध्ये पाण्याच्यामध्ये एक बार आहे. यात फक्त फायरमॅन पोलच्या सहाय्याने पोहोचू शकतो.

- हेफनर यांचं घर लाॅस एेजेलिस इथं तब्लब 5 एकर भागात उभारलंय. या आलिशान घरात सोईसुविधांसह 22 खोल्या होत्या. त्यानंतर 120 अब्ज रुपयात याची विक्री करण्यात आली.

- मासिकाच्या इतिहासात हेफनर सर्वात जास्त वेळ मुख्य संपादक ठरले आहे.

 - व्य़क्तिगत स्क्रॅपबुकमध्ये सर्वात मोठं कलेक्शन करण्याचा वर्ल्ड रेकाॅर्ड केलाय.

- 180 देशात 2500 पेक्षा जास्त स्टोर्स आणि प्लेबाॅयचं साहित्य विकलं जातं.

- हेफनर यांनी 2015 मध्ये तिसरं लग्न केलं होतं. त्यावेळी त्यांचं वय हे 86 होतं आणि त्यांच्या पत्नी त्यांच्यापेक्षा 60 वर्षाने लहान होती.

- प्लेबाॅय एंटरप्राईजेस आता टेलीव्हिजन नेटवर्क, वेबसाईट्स, मोबाईल प्लॅटफाॅर्म्स आणि रेडिओद्वारे आंबकशौकिनांनी अडल्ट माहिती पुरवली जातेय.

- हेफनर यांच्या मृत्यूसमयी प्लेबाॅय 43 मिलियन डाॅलरची कंपनी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2017 06:30 PM IST

ताज्या बातम्या