भारतामुळे होमग्राऊंडवरच अॅमेझाॅनच्या तोट्यात 5 पटीने वाढ

भारतामुळे होमग्राऊंडवरच अॅमेझाॅनच्या तोट्यात 5 पटीने वाढ

अॅमेझॉन या बलाढ्य ई-रिटेलिंग कंपनीला झालेल्या तोट्यात 5 पटीनं वाढ झालीय. त्याचं कारण आहे अॅमेझॉनची भारतातली गुंतवणूक..

  • Share this:

अमेय चंभळे, मुंबई

29 जुलै : अॅमेझॉन या बलाढ्य ई-रिटेलिंग कंपनीला झालेल्या तोट्यात 5 पटीनं वाढ झालीय. त्याचं कारण आहे अॅमेझॉनची भारतातली गुंतवणूक..

अॅमझॉन. जगातली सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी. अॅमेझॉनच्या साईटवर काय मिळत नाही? केसाच्या पिनेपासून फ्रिजपर्यंत..टीव्ही पासून लहान मुलांच्या खेळण्यांपर्यंत...पुस्तकांचा विशेष उल्लेख करायला हवा. पण या तिमाहीत अॅमझॉनचा तोटा पाच पटीनं वाढलाय. या तिमाहीत कंपनीला 72 कोटी 40 लाख डॉलर्सचा तोटा झालाय..अर्थात साडे चार हजार कोटींपेक्षाही जास्त. नजर टाकूयात आकडेवारीवर..

अॅमेझॉनचा तोटा (डॉलर्स)

- एप्रिल-जून 2017        -   72.4 कोटी

- जानेवारी - मार्च 2017 -   48.1 कोटी

- ऑक्टो.-डिसें. 2016    -   13.5 कोटी

याचं मुख्य कारण आहे कंपनीची भारतातली गुंतवणूक. फ्लिपकार्टला टक्कर देण्यासाठी आणि जास्तीत जास्त मार्केट शेअर आपल्याकडे वळवण्यासाठी अॅमेझॉन भारतात खोऱ्यानं पैसा ओततंय. मोठी सूट देणं.. मोठमोठाले गोडाऊन उभारणं.. गोडाऊन व्यवस्थापन प्रणाली उभी करणं..वेबसाईट जास्त सूकर करणं.. यावर कंपनी भरपूर पैसे खर्च करतेय. यामागचं कारण स्पष्ट आहे  भारतातली बाजारपेठ आधीच मोठी आहे, आता तर ती झपाट्यानं वाढतेय. याचा दूरगामी फायदा अॅमझॉनला हवाय. त्यांना नकोय की कंपनीनं मोक्य़ाच्या वेळी मागे पडावं. आणि त्यांना फक्त एकच स्पर्धक आहे - फ्लिपकार्ट.

भारत ही जगातल्या ई-कॉमर्स क्षेत्रातली काबीज करण्यासारखी शेवटची बाजारपेठ आहे. भारतीयांना सध्या ऑनलाईन गोष्टी मागवायची सवय झपाट्यानं लागतेय. आणि अॅमेझॉनला माहितीय की हे वाढतच जाणार. त्यामुळे कंपनीचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेझो भारतावर लक्ष ठेवून आहेत. मोदी अमेरिकेत गेले होते तेव्हाही बेझो त्यांना भेटले. आता भारतात आणखी कोणती रणनीती कंपनी आखते, ते पाहायचं.

First published: July 29, 2017, 11:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading