S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

तयार होतोय मराठा मोर्चाचा माहोल

बुधवारी मुंबईत धडकणाऱ्या मराठा मोर्चाचा माहोल तयार करण्यासाठी रविवारी मुंबईसह महाराष्ट्रात ठिकठिकाणी बाईक रॅली निघाल्या. अनेक मराठा तरुण-तरुणींनी या बाईकवरून भगवा झेंड्यासह गावागावात फेरी काढली.

Sonali Deshpande | Updated On: Aug 6, 2017 05:24 PM IST

तयार होतोय मराठा मोर्चाचा माहोल

 मंगेश चिवटे,हलिमा कुरेशी, मुंबई, 06 आॅगस्ट : मुंबईत 9 ऑगस्टला होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चा एकमेव अद्वितीय ठरण्याची शक्यता आहे. मुंबईतील मराठा मोर्चाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर समाजमन ढवळून निघालंय. पाहुयात मराठा मोर्चाच्या तयारीचा हा रिपोर्ट.

कोपर्डीच्या घटनेचं निमित्त ठरलं आणि महाराष्ट्रातील मराठा समाज एकत्र आला. मराठा आरक्षण आणि अन्य मागण्यासाठी सकल मराठा समाजाचे महाराष्ट्रभर लाखालाखांचे मोर्चे निघाले.येत्या 9 ऑगस्टला मराठा समाजाचा क्रांती मोर्चा मुंबईत धडकणार आहे. मुंबतील मोर्चा भव्य व्हावा यासाठी महाराष्ट्रभर बाईक रॅली निघत आहेत. औरंगाबादनंतर आज पुणे आणि नवी मुंबईत मोठ्या बाईक रॅली निघाल्या. जास्तीत जास्त मराठा बांधवांनी मुंबईच्या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन बाईक रॅलीच्या माध्यमातून करण्यात येतंय.

मुंबईतील मराठा मोर्चाला लाखो नागरिकांची उपस्थिती अपेक्षित असल्याने वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत.मुंबईतील मराठा क्रांती मोर्चात महाराष्ट्रातील मराठा बांधवांची ऐतिहासिक एकजूट दिसण्याची शक्यता आहे. मुंबईतील मराठा मोर्चा गर्दीचे उच्चांक मोडेल आणि नवीन रेकॉर्ड करेल असा दावा आयोजकांकडून करण्यात येतोय. 9 ऑगस्टचा मुंबईतील मराठा क्रांती मोर्चात गर्दीने अवघ्या महाराष्ट्रातील समाजमन ढवळून निघालंय.

ऐन अधिवेशना दरम्यान मुंबईत मराठा मोर्चा निघणार असल्याने राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघालंय. मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्यानं राज्य सरकारला दिलासा असला तरी अन्य महत्वाच्या मागण्यासाठी मात्र सरकारची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे. मेहता - मोपलवार यांच्या राजीनामाच्या मागणीवरून विधानसभेत रणकंदन होत असताना मुंबईतील मराठा मोर्चा सरकारच्या अडचणीत भर टाकणारा आहे यात शंका नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 6, 2017 04:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close