कुंदन जाधव, अकोला, 11 आॅगस्ट : परिस्तिथी कुणालाही कुठलंही काम करण्यास भाग पाडते, असे अनेक किस्से आपण पहिले आहेत. परंतु ब्युटी पार्लरचा कोर्स केलेल्या अकोल्यातील मालती डोंगरेला परिस्तितीशी दोन हात करण्यासाठी पतीसोबत चक्क माणसांची दाढी आणि कटिंग करावी लागते.
दाढी कटिंग करणारे डोक्याला हेअरडाय करणारे हे हात सलूनमधील कुण्या पुरुषाची नाहीत, तर हे हात आहेत एका स्त्रीचे. हो आश्चर्य वाटलं ना...पण हे खरं आहे. ह्या आहेत अकोल्यातील शिवणी परिसरातील मालती डोंगरे. हलाखीची परिस्तितीत आणि मुलांचं शिक्षण अशा अनेक समस्यांचा सामना करत, मालतीताईने सलूनमध्ये पतीसोबत पुरुषांची दाढी-कटिंग करण्याचा निर्णय घेतला. अकोल्याच्या एमआयडीसीमध्ये हमालीच काम करणाऱ्या पती विनोदचा अपघात झाल्यानंतर, विनोदला जड काम करता येत नव्हते, म्हणून मालतीचे पती विनोदने छोटस सलुनच दुकान सुरू केलं. ब्युटी पार्लरचा कोर्स केलेला असतानाही, हलाखीच्या परिस्तिथीमुळे ब्युटी पार्लर टाकता आलं नाही. म्हणून मालतीने पतीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला. पुरुषांची दाढी-कटिंग करते म्हणून सुरुवातीला समाजातून खूप विरोध झाला. टीकाही झाल्यात. पण समाजाचा विरोध झुगारत आपल्या परिवारासाठी मालती ठाम उभी राहिली, यात तिला पतीचीही साथ मिळाली. सुरुवातील पुरुषांची दाढी-कटिंग करायला डगमगलेल्या मालतीचे हात आता. सहज कैची आणि वस्तरा फिरवताना दिसतात.
मालतीचे पती विनोद डोंगरे अकोल्यातील MIDC परिसरात हमालीच काम करायचे, एका अपघातानंतर त्यांना जड काम करता येत नव्हतं. म्हणून त्यांनी कैची आणि वस्तरा घेऊन, दाढी कटिंग करण्याचा निर्णय घेतला. हे काम विनोद डोंगरेच नव्हतं त्यांनी या आधी कधीच कैची आणि वस्तरा हातात घेतला नव्हता. पण जड काम होत नाही आणि परिवाराची जबाबदारी यासाठी सलूनच काम शिकलं आणि आपलं छोटंस दुकान थाटलं. पण एकट्याच्या भरवश्यावर उत्पन्न होत नसल्याने, ब्युटी पार्लरचा कोर्स केलेल्या पत्नीला आपल्या सोबत काम करण्यास विनंती केली. आणि आज दोन वर्षांपासून दोघे पती-पत्नी सोबत सलूनमध्ये लोकांच्या टीकेला दुर्लक्ष करत, दाढी कटिंग करतायेत. आणि आपला छोटाश्या सुखी संसारच गाड हाकतायेत.
एक स्त्री सलूनमध्ये पुरुषांची दाढी-कटिंग करते, हे पाहून येणारे ग्राहक सुरुवातील दबकत होते. परंतु डोंगरे परिवाराची परिस्तिथी आणि मालतीताईंचा स्वभाव पाहून..जणू आपली बहीणच आहे की असा विश्वास येणाऱ्या ग्राहकांना व्हायला लागला आणि आता मनात कोणतीही शंका न ठेवता लोकं दाढी-कटिंग करायला. बिनधास्त येतात. आणि विशेष म्हणजे या सलूनमध्ये वाजवी भावात दाढी-कटिंग केली जात असल्याने, ग्राहकांची झुंबड या दुकानात असते.
दुःखाचा डोंगर कोसळला तरी जिद्दीने उभी राहून परिस्तितीशी दोन हात करणाऱ्यांपैकी मालती डोंगरे एक आहेत. पुरुष प्रधान समाजात पुरुषांच्या व्यवसायात त्यांच्या खांद्याला खांदा लावून मालती काम करतात. परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या मालतीताई सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा