...जेव्हा अजित पवार खड्ड्यासोबत सेल्फी घेतात !

...जेव्हा अजित पवार खड्ड्यासोबत सेल्फी घेतात !

धनंजय मुंडे यांना, धनंजय तूच या खड्ड्यांचे सेल्फी काढ अन् चंद्रकांत दादांना पाठव रे बाबा म्हणत सेल्फीत भाग घेत आपली नाराजी दाखवली.

  • Share this:

 

19 जानेवारी : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 15 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली असली तरी राज्यातील खड्डे आजही कायम आहे. मराठवाडा दौऱ्यावर आलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही सेल्फी विथ खडडे मोहिमेत सहभाग घेतलाय. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना, धनंजय तूच या खड्ड्यांचे सेल्फी काढ अन् चंद्रकांत दादांना पाठव रे बाबा म्हणत सेल्फीत भाग घेत आपली नाराजी दाखवली.

आज औसा (लातूर) येथील हल्लाबोल सभा झाल्यानंतर निलंगामार्गे उदगीरला जात असताना अजितदादांना रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. अजित पवारांनी रस्त्यावर उतरून रस्त्याची पाहणी केली. यावेळी धनंजय मुंडे यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी चालवलेल्या #selfiewithpotholes अभियानाची आठवण करुन दिली. त्यावर अजित पवारांनी "मला काही ते सेल्फी बेल्फी जमत नाही. तूच या खड्ड्यांचा सेल्फी काढून त्या चंद्रकांत पाटलांना पाठव रे बाबा...” असं सांगितलं. मग धनंजय मुंडे यांनी मग तात्काळ आपल्या फोन मधून त्या खड्ड्यांसह सेल्फी काढत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना ट्विटर वर पाठवला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हल्लाबोल यात्रेचा दुसरा टप्पा मराठवाड्यात सुरु आहे. उस्मानाबाद, बीड आणि आज लातूर जिल्यात हल्लाबोल सभा झाल्या. यानिमित्ताने राष्ट्रवादीचे सर्व नेते मराठवाड्यात आहेत. कालच भूम ते पाटोदा प्रवास केल्यानंतर पाटोदा येथील सभेत अजितदादांनी खड्ड्यावरून सरकारवर टिका केली होती. मराठवाड्यात रस्त्यात खड्डे कि खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही, असं ते म्हणाले होते.

आता स्वतः अजित पवार यांनीच रस्त्यातील खड्ड्याची सेल्फी काढून पाठवल्याने चंद्रकांत पाटील त्याला कसा प्रतिसाद देतात हे पाहण्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2018 05:08 PM IST

ताज्या बातम्या