आता बस्स !,आम्ही पण संपावर जाणार ;नगरच्या शेतकऱ्यांच्या निर्धार

आता बस्स !,आम्ही पण संपावर जाणार ;नगरच्या शेतकऱ्यांच्या निर्धार

डॉक्टर संप करतात, वकिल संप करतात, थोडसं काही झालं की नोकरदार उठतो आणि संप करतो. आता अहमदनगरचे शेतकरी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत..

  • Share this:

साहेबराव कोकणे, अहमदनगर

30 मार्च : डॉक्टर संप करतात, वकिल संप करतात, थोडसं काही झालं की नोकरदार उठतो आणि संप करतो. परिस्थिती कितीही हलाखीची होवो शेतकरी मात्र ढग जमायला लागले की, पेरणीला लागतो. ह्यावर्षी नाही झालं तर पुढच्या वर्षी चांगलं पिक आलं तर विकलं जाईल या आशेवर वर्षानुवर्षे चालतोय. पण हे चित्रं आता बदलत असून अहमदनगरचे शेतकरी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत.

तुरीची खरेदी बंद...

टोमॅटो 10 रूपये किलो...

मिर्चीच्या फडावर नांगर फिरवण्याची वेळ...

परिणाम गेल्या दशकभरात लाखभर शेतकऱ्यांच्या आत्महत्या. कधी ओला दुष्काळ पडतो तर कधी कोरडा दुष्काळ. शेती पिकतच नाही. काबाडकष्ट करून पिकवली तर शेतकऱ्याच्या मालाचे भाव सरकारच पाडतं. देशात तुरीचं विक्रमी उत्पादन झालं तर खरेदी बंद केली जाते, भाव पाडण्यासाठी आयात केली जाते. द्राक्ष, कांदा पिकला तरी निर्यातीवर बंदी आणली जाते. परिणामी शेतीमाल कवडीमोल भावानं विकावा लागतो. अनेक आंदोलनं झाली पण स्थिती काही बदलत नाहीय. शेवटी नगरच्या शेतकऱ्यांनी आता थेट संपावर जायचं ठरवलंय.

जुनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात मान्सून दाखल होतो. गावोगावी शेतकरी पेरता होतो. पण येत्या 1 जुनपासून मातीत तिफनच टेकवायची नाही असा निर्धार नगर, औरंगाबादमधल्या जवळपास 40 गावच्या शेतकऱ्यांनी केलाय. त्याची सुरुवात पुणतांबे गावापासून होणार आहे. 3 एप्रिलला त्यासाठी हजारो शेतकरी पुणतांबेत जमणार आहेत.

पहिल्या टप्यात शेतकरी दूध बंद करणार आहेत. त्यानंतर भाजीपाला न विकण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर फक्त स्वत:च्या घरादाराला पुरेल एवढच पिकवायचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलाय. शेतकऱ्यांचा हा होऊ घातलेला संप ऐतिहासिक आहे. तो यशस्वी करण्यासाठी गावोगावच्या शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची तयारी चालवलीय.

First published: March 30, 2017, 5:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading