दिवाळीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार,राणेंसह 12 नव्या चेहऱ्यांचा समावेश ?

दिवाळीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार,राणेंसह 12 नव्या चेहऱ्यांचा समावेश ?

शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारात बारा नवे चेहरे समाविष्ट होणार असल्याचं खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितलंय.

  • Share this:

17 आॅक्टोबर : दिवाळीनंतर राज्यातील फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारात बारा नवे चेहरे समाविष्ट होणार असल्याचं खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितलंय.

राज्यात मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावून बसलेल्या इच्छुकांसाठी बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार दिवाळीनंतर होणार आहे. दिवाळीनंतर मंत्रिमंडळ विस्तारात 5 कॅबिनेट आणि 7 राज्यमंत्री अशा बारा जणांचा समावेश केला जाणार आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे आज मुख्यमंत्र्यांनी अधिकृतपणे जाहीर केले, दिवाळीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून 5 कॅबिनेट तर 7 राज्यमंत्री मिळून 12 मंत्री शपथ घेतील, अलीकडे स्वतंत्र पक्ष स्थापन राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आलेल्या नारायण राणे याच्यांबाबत योग्य निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री म्हणाले, याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे संकेत दिले आहेत की राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. त्यांना कोणते खाते दिले जाणार याबाबत मात्र अद्याप अनिश्चितता आहे.

'अनुभवाचा सन्मान करा' अशी राणेंनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. पण त्यांना कोणते खाते द्यायचे याचा निर्णय होत नाही आहे, कारण राणेंना अपेक्षित असलेली खाती सोडणे अवघड आहे, आणि त्याशिवाय खाती मिळाली तर ते नाराज होऊन डोईजड ठरू शकतात, हे शक्यता लक्षात घेऊन भाजपातर्गंत या विषयावर चर्चा सुरु आहे.

राणेंचं समाधान होईल असं खातं देण्यासाठी खलबतं सुरू असल्याचं सांगण्यात येतंय. फडणवीस मंत्रिमंडळाचा हा बहुदा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार असणार आहे. त्यामुळे टीम फडणवीसमध्ये वर्णी लावण्यासाठी इच्छुकांनी जोर लावलाय.

First published: October 17, 2017, 9:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading