सारं काही तोंडपाठ, चिमुरड्या आरोहीची इंडियास् वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी

आपल्या अभिजात, अविश्वसनीय पाठांतर क्षमतेच्या जोरावर चार विक्रम नोंदवले

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 3, 2017 09:07 PM IST

सारं काही तोंडपाठ, चिमुरड्या आरोहीची इंडियास् वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी

विजय राऊत, डहाणू

03 एप्रिल : डहाणू तालुक्यातल्या 2 वर्षांच्या आरोहीचं सर्वत्र कौतुक होतंय. कारण आपल्या अफलातून पाठांतराच्या जोरावर तीने तब्बल 4 विक्रम केले आहेत.

डहाणू तालुक्यातील वाणगाव इथं जिल्हा परिषद शाळेत शिक्षक पदावर कार्यरत असलेल्या पावबाके दाम्पत्याच्या एकुलत्या एक लेकीने आपल्या अभिजात अविश्वसनीय स्मरणशक्तीचा जोरावर इंडियास् वर्ल्ड रेकॉर्डमध्ये विक्रमाची नोंद केलीये.

आरोही असं या चिमुकलीचं नाव असून  सरला आणि विजय पावबाके या दाम्पत्याची ही एकुलती एक मुलगी...वय २ वर्ष ४ महिने. तिच्या समवयीन मुलं भाषा बोलण्याचे प्राथमिक धडे घेत असतांना आरोहिने मात्र इंडियास् वर्ल्ड रेकॉर्ड या जगभरातील भारतीयांचं रेकॉर्ड नोंदवणाऱ्या संस्थेत एक दोन नव्हेत तर तब्बल ४ विक्रम नोंदवलेत.

रेकॉर्ड नोंदणीच्या किड्स मेमोरी कॅटेगरीमध्ये तिने आपल्या अभिजात, अविश्वसनीय पाठांतर क्षमतेच्या जोरावर चार विक्रम नोंदवलेत.

आरोहीची पाठांतर क्षमता इतकी आहे की बालगिते, इंग्रजी मुळाक्षरं, रंग ओळख चित्र ओळख, बडबड गीतं असं सगळं तिच्या तोंडपाठ आहेत.  छोट्या आरोहिच्या या अफलातून पाठांतर क्षमतेचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 3, 2017 08:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close