गौर आणि तगरखेडा इथे 'तारे जमीं पर'

गौर आणि तगरखेडा इथे 'तारे जमीं पर'

बॉलिवूडमधला मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं काल लातूर जिल्ह्यातल्या गौर आणि तगरखेडा गावातल्या वॉटरकपच्या जलसंधारण कामांना अचानक भेटी दिल्या. फावडं कुदळ हातात घेऊन त्यानं कामही केलं.

  • Share this:

नितीन बनसोडे, 26 एप्रिल :  तो आला त्यानं पाहिलं, नुसतंच पाहिलं नाही तर श्रमदान करुन गावकऱ्यांचा हुरूप वाढवला. बॉलिवूडमधला  मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं काल लातूर जिल्ह्यातल्या गौर आणि तगरखेडा गावातल्या वॉटरकपच्या जलसंधारण कामांना अचानक भेटी दिल्या. नुसतं कामांना भेटी देऊन तो थांबला नाही तर फावडं कुदळ हातात घेऊन त्यानं कामही केलं.

काम केल्यानंतर आमिरनं लोकांनी बरोबर बांधून आणलेल्या चटणी भाकरीवर तावही मारला. वॉटरकप स्पर्धेच्या निमित्तानं लोकांमधील श्रमशक्ती जागृत करण्याचा त्यानं प्रयत्न केला.

राज्यातल्या तीस तालुक्यात सध्या वॉटरकप स्पर्धेंतर्गत कामं सुरू आहेत. पुढच्या वर्षी शंभर आणि त्याच्या पुढच्या वर्षी संपूर्ण राज्यात ही स्पर्धा राबवणार असल्याचं आमिर म्हणाला.

अभिनयक्षेत्रात आमिरनं स्वतःच्या कामानं एक वेगळी छाप सोडलीये. आता वॉटरकप स्पर्धेसारखं एक काम हातात घेऊन आमिर थांबलेला नाही तर ते काम कसं चालतं आणि ते पूर्णत्वाकडं कसं जाईल याकडं त्याचं संपूर्ण लक्ष आहे. रिल लाईफमधला हा हिरो रिअल लाईफमधलाही हिरो झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2017 01:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading