एक रुपयाची नोट झाली 100 वर्षांची, असा होता इतिहास !

एक रुपयाची नोट झाली 100 वर्षांची, असा होता इतिहास !

अन्य भारतीय नोटांप्रमाणे ती भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेली नाही तर भारत सरकार स्वतःच या नोटेची छपाई करते

  • Share this:

30 नोव्हेंबर : "एक रुपया चांदी का देश हमारे गांधी का" असं म्हणत खरतर आपलं बालपण केलं. त्यानंतर लग्न समारंभात किंवा इतर कार्यक्रात एक रुपयाच्या नाण्याचं आणि नोटेचं एक वेगळंच महत्त्व आलं. समारंभात आपण अनेकांना पैशांचे लिफाफे देतो. आता त्यात एक रुपयाचं नाणं असलेल्या लिफाफ्यांची पद्धत आली आहे. पण त्याकाळची लोकं वरचा एक रुपया देण्यासाठी 1 रुपयाची नोट वापरायचे. पण तुम्हाला माहीत आहे का आता याच 'एक रुपया'च्या नोटेला '100 वर्ष' पूर्ण झाली आहेत. एक रुपयाच्या या नोटेला मोठ इतिहास लाभलेला आहे.

ब्रिटीश काळातील एक रुपयाची नोट

ब्रिटीश काळातील एक रुपयाची नोट

तर झालं असं की, तो काळ होता पहिल्या महायुद्धाचा आणि देशावर सत्ता होती ती ब्रिटिशांची. त्या काळात चांदीची नाणी वापरात होती परंतु युद्धाच्या काळात सरकार चांदीची नाणी बनवू शकलं नाही आणि म्हणूनच 1917 मध्ये पहिल्यांदाच एक रुपयाची नोट वापरात आणण्यात आली.

तब्बल 100 वर्षांआधी म्हणजे, 30 नोव्हेंबर 1917 ला ही एक रुपयाची नोट वापरता आणण्यात आली होती. या नोटेवर ब्रिटेनचा राजा जॉर्ज पंचम यांचा फोटो छापलेला होता.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटनुसार, ही नोट बनवण्यासाठी जास्त खर्च असल्यामुळे 1926 ला पहिल्यांदा या नोटेच्या छपाईवर बंदी घालण्यात आली. यानंतर 1940 मध्ये पुन्हा छपाईला सुरुवात झाली जी 1994 पर्यंत पुढे चालू राहिली. नंतर, 2015 मध्ये पुन्हा या नोटची छपाई सुरू झाली.

'एक रुपया'च्या नोटेचे वैशिष्ट्य

- या नोटेचं खास वैशिष्ट्य असं की, अन्य भारतीय नोटांप्रमाणे ती भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेली नाही तर भारत सरकार स्वतःच या नोटेची छपाई करते.

- या नोटेवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरच्या स्वाक्षरीऐवजी देशाच्या अर्थ सचिवाची स्वाक्षरी असते.

- इतर नोटा या प्रॉमिसरी नोट असतात ज्यात धारकाने समान रक्कम देण्याचे आश्वासन दिले जाते. पण 1 रुपयाची नोट ही कायदेशीररित्या वास्तविक नोट (करेंसी नोट)आहे.

एक रुपयाची नवी नोट

एक रुपयाची नवी नोट

दादरचे प्रमुख नाणे संग्राहक गिरीश वीरा म्हणाले की, 'पहिल्या महायुद्धादरम्यान, चांदीची किंमत वाढली होती त्यामुळे पहिल्या एक रुपयाच्या नोटेवर एक रुपयाच्या नाण्याचे छायाचित्र आहे. त्यामुळे कदाचित या नोटेला त्या काळात नाणं असेही म्हणायचे.

पहिल्या एक रुपयाच्या नोटेवर ब्रिटीश सरकारचे अर्थ सचिव एमएमएस गुब्बे, एसी मॅकवाटर्स आणि एच. डेनिग या तिघांच्या स्वाक्षऱ्या होत्या. स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत 18 अर्थ सचिवांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या नोटा जारी करण्यात आल्या आहेत.

गिरीश वीरा यांच्या माहितीनुसार, आत्तापर्यंत 2 वेळा एक रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली आहे आणि तीन वेळा त्याच्या डिझाईन्समध्ये बदल केले गेले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2017 12:05 PM IST

ताज्या बातम्या