नांदेडमध्ये 'बिटकाॅईन'ने अनेकांना घातला कोट्यवधीचा गंडा, गुन्हा दाखल

नांदेडमध्ये 'बिटकाॅईन'ने अनेकांना घातला कोट्यवधीचा गंडा, गुन्हा दाखल

जगभरासह भारतातही चलनाला पर्याय ठरू पाहणाऱ्या गेन बिटकॉईन कंपनीने नांदेडमधील अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातलाय.

  • Share this:

29 जानेवारी : जगभरासह भारतातही चलनाला पर्याय ठरू पाहणाऱ्या गेन बिटकॉईन कंपनीने नांदेडमधील अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातलाय. या प्रकरणात नांदेडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

नांदेडमधील अनेकांनी या गेन बिटकॉईन कंपनीशी करार करुन आपले बिटकॉईन सॉफ्टवेअर दिले. सुरुवातील 2 ते 3 महिने अनेकांना 10 टक्के रक्कम प्राप्त झाली. पण त्यानंतर गेन बिटकॉईनकडून गुंतवणुदारांची फसवणुक सुरू झाली.

विमानतळ पोलीस ठाण्यात फसवणुक केल्याप्रकरणी कलम 420 आणि 406 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. नांदेडमधील गेन बिटकॉईन चे एजंट बालाजी पांचाळ, राजू मोतेवार, अमोल थोंबाळे आणि मुख्य आरोपी अमित भरद्वाज याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तर आरोपी अमोल थोंबाळेला अटक केली.

गेन बिटकॉईनचा निर्माता अमित भारद्वाज सध्या दुबईमध्ये आहे. संपूर्ण भारतात त्याच्या गेन बिटकॉईनचे जाळे आहे. गेन बिटकॉईनच्या माध्यमातून भारद्वाजने अब्जावधी रुपये कमावल्याची माहिती आहे. दुबईत भारद्वाज आलिशान लाईफ जगतोय. भारतात अनेकांना अब्जावधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या अमित भारद्वाज पर्यंत पोलिसांचे हात कसे पोहोचणार हा खरा प्रश्न आहे.

First published: January 29, 2018, 8:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading