S M L

3 लाख 17 हजार ४०० उंदीर नव्हे 'त्या' फक्त गोळ्या, सरकारकडून घोटाळ्यावर पडदा

चिक्की घोटाळ्यानंतर सोशल मीडियावर उंदीर घोटाळा खिल्ली उडवला गेलेला सर्वात मोठा घोटाळा ठरला

Sachin Salve | Updated On: Mar 26, 2018 07:18 PM IST

3 लाख 17 हजार ४०० उंदीर नव्हे 'त्या' फक्त गोळ्या, सरकारकडून घोटाळ्यावर पडदा

प्रफुल्ल साळुंखे, मुंबई

26 मार्च : मंत्रालयात उंदीर घोटाळ्या प्रकरणात इतके उंदीर मारलेत नाही, त्या फक्त गोळ्यांची संख्या आहे असा खुलासा सरकारने केलाय. पण सरकारची पारदर्शकता या घोटाळ्याची पुरती कुरताडली.

चिक्की घोटल्यानंतर भाजप सरकारची जेवढी नाचक्की झाली,  त्याच प्रमाणे उंदीर निर्मूलन घोटाळा गाजतोय. 7 दिवसात मंत्रालयात 3 लाख 17 हजार उंदीर मारल्याचा कागदोपत्री दाखवण्यात आला. त्याच बिलं दिल, कंपनीही बोगस निघाली.

आज सभागृहाचे कामकाज सुरू होताच सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवेदन दिलं. इंटरनेटच्या केबल्स आणि वीजेच्या केबल्स सुरक्षित राहण्यासाठी उंदीर निर्मूलनाचे काम हाती घेण्यात आले होते.  उंदीर निर्मूलनाकरता 1984 पासून हे काम सातत्याने हाती घेण्यात आले आहे. मंत्रालयात उंदीर निर्मूलनासाठी ३ लाख १९ हजार ४०० गोळ्या ठेवण्यात आल्या होत्यात. मुळात  ती संख्या मृत उंदरांची नाही असा खुलासाच चंद्रकांत पाटील यांनी केली.

त्याचबरोबर जी कंपनी बोगस आहे असा दावाही पाटील यांनी खोडून काढला.  विनायक मजूर सहकारी संस्थेला हे काम देण्यात आले होते. समितीमार्फत हे काम दिले जाते, केवळ वर्क ऑर्डर काढण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभाग करते. विनायक मजूर सहकारी संस्थेच्या अस्तित्वाची माहिती घेण्याचे पत्र दिलं आहे अशी माहिती पाटील यांनी दिली.

Loading...
Loading...

विशेष म्हणजे हा घोटाळा विरोधकांनी काढला नाही तर खुद्द भाजप आमदार चरण वाघमारे यांनी काढला, एकनाथ खडसे यांनी तो मांडला. त्यामुळे विरोधकांना आयतं कोलीत मिळालं.

परंतु, चिक्की घोटाळ्यानंतर सोशल मीडियावर उंदीर घोटाळा खिल्ली उडवला गेलेला सर्वात मोठा घोटाळा ठरला, सरकार कंपनीची चौकशी करू असं सांगत विषय पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

सरकार पारदर्शीपणा बाबत प्रतिमा तयार करत असताना मंत्रालयात काय कुरतडलं जातंय हे समोर आलंय. पण आगामी दोन वर्षे या मुद्यावरून उडालेल्या टिंगलचा सामना सरकारला करावा लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 26, 2018 07:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close