मराठी बातम्या /बातम्या /religion /

2023 हे वर्ष `या` पाच राशींसाठी असेल विशेष शुभफलदायी

2023 हे वर्ष `या` पाच राशींसाठी असेल विशेष शुभफलदायी

2023 हे वर्ष या राशींसाठी महत्त्वाचे

2023 हे वर्ष या राशींसाठी महत्त्वाचे

नवीन वर्ष आपल्याला कसं जाईल, हे जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • New Delhi, India

2022 हे वर्ष संपण्यासाठी आता जेमतेम एक महिना राहिला आहे. सामान्यपणे डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच आपल्याला नवीन वर्षाचे वेध लागतात. नवीन वर्ष आपल्यासाठी कसं असेल, असा प्रश्न सरत्या वर्षाच्या शेवटी प्रत्येकाच्या मनात येतो. यासाठी काही जण ज्योतिष अभ्यासकांचा सल्ला देखील घेतात. ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या गोचर भ्रमणानुसार आगामी वर्षाचं भविष्य वर्तवलं जातं. त्यानुसार 2023 हे वर्ष पाच राशींसाठी खास ठरणार आहे. या पाच राशींना पुढील वर्षभरात शुभ फळं मिळतील, असं ज्योतिषशास्त्राच्या जाणकारांचं मत आहे. `टीव्ही नाइन हिंदी`ने या विषयी माहिती दिली आहे.

2023 हे नवीन वर्ष सुरू होण्यास आता केवळ महिना बाकी आहे. नवीन वर्षाची सुरुवात प्रत्येकासाठी ऊर्जादायी असते. गतवर्षात बाकी राहिलेली कामं, मनातल्या इच्छा-अपेक्षा आणि यश नवीन वर्षात मिळेल असं प्रत्येकाला वाटत असतं. नवीन वर्ष आपल्याला कसं जाईल, हे जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता असते. नोकरी, व्यापार, धनलाभ, प्रॉपर्टी आदी गोष्टींसाठी नवीन वर्ष कसं असेल याचा विचार प्रत्येक जण करत असतो. 2023 या नवीन वर्षाचा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार करता, आगामी वर्ष हे पाच राशींसाठी विशेष लाभदायक असेल.

मेष : मेष राशीच्या व्यक्तींना 2023 हे नवीन वर्ष खूप चांगलं जाईल. या वर्षी तुमच्या जवळपास सर्व इच्छा पूर्ण होतील. व्यापारी जातकांना व्यापाराशी संबंधित नवीन संकल्पनांमध्ये यश मिळेल आणि त्यातून चांगलं उत्पन्न मिळेल. वर्षभर नशिबाची साथ मिळेल. या कालावधीत अपूर्ण किंवा रखडलेली कामं पूर्ण होतील. गतवर्षीच्या तुलनेत नवीन वर्षात जास्त पैसा मिळू शकेल. समाजात मान-सन्मान लाभेल. राजकीय व्यक्तींसाठी हे वर्ष यशदायी ठरेल. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना 2023 मध्ये चांगलं यश मिळेल.

हेही वाचा - प्रेमात कधीच धोका देत नाही या मुली, भरभरून प्रेम करतात...

सिंह : सिंह राशीच्या जातकांना 2023 मध्ये रवी आणि शनी या दोन्ही ग्रहांची विशेष कृपादृष्टी लाभेल. वर्षाच्या सुरुवातीला रवी सिंह राशीच्या पाचव्या भावात तर शनी सातव्या भावात असेल. 2023 मध्ये तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. व्यापारी वर्गाला आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. अचानक धनलाभाचे योग आहेत. कुटुंबात सुख-शांती राहील.

तूळ : आगामी 2023 हे वर्ष तूळ राशीच्या जातकांना चांगलं जाईल. तुम्हाला आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळतील. त्यामुळे तुम्ही या वर्षी सर्व प्रकारच्या सुखसोयींचा आनंद घेऊ शकाल. नोकरदार वर्गाला पदोन्नती आणि वेतनवाढीचे योग आहेत. वर्षाच्या मध्याला अचानक धनलाभाच्या चांगल्या संधी येतील. या वर्षी तुम्ही जमीन किंवा अन्य योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास यश मिळेल.

धनु : धनु राशीच्या जातकांसाठी 2023 हे वर्ष वरदान ठरेल. वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला शनिच्या साडेसातीपासून मुक्ती मिळेल. या वर्षी कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये प्रगती दिसून येईल. हे वर्ष तुमच्यासाठी भाग्यशाली ठरेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे तुम्ही प्रत्येक आव्हानाचा चांगल्या पद्धतीनं सामना करू शकाल. या वर्षात एखादं नवीन काम सुरू करणं फायदेशीर ठरेल.

कुंभ : व्यापाराच्या दृष्टिकोनातून 2023 हे नवीन वर्ष फायदेशीर ठरेल. जे जातक व्यापार किंवा उद्योगक्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी हे नवीन वर्ष नव्या व्यवसायात हात आजमावण्याचं असेल. या वर्षी प्रगती आणि आर्थिक लाभाच्या संधी येतील. 2023 हे वर्ष उत्तम जाईल. कुटुंबियांचं सहकार्य मिळाल्याने तुम्ही इच्छित सर्व गोष्टी करू शकाल.

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, Rashibhavishya, Rashichark