मराठी बातम्या /बातम्या /religion /सूर्याशी संबंधित असलेली ही कामं रविवारी करणं टाळा; नकारात्मक परिणामांपासून वाचाल

सूर्याशी संबंधित असलेली ही कामं रविवारी करणं टाळा; नकारात्मक परिणामांपासून वाचाल

रविवारी कोणती कामे करू नये

रविवारी कोणती कामे करू नये

धार्मिक श्रद्धेनुसार सूर्यदेवाची उपासना केल्याने चैतन्य, मानसिक शांती, ऊर्जा आणि जीवनात यश मिळते. यामुळेच लोक उगवत्या सूर्याचे दर्शन घेणे शुभ मानतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 02 एप्रिल : रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो. या दिवशी सूर्यदेवाची विशेष पूजा केली जाते. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केले जाते. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सूर्यदेवाची उपासना केल्याने चैतन्य, मानसिक शांती, ऊर्जा आणि जीवनात यश मिळते. यामुळेच लोक उगवत्या सूर्याचे दर्शन घेणे शुभ मानतात. पण, अशा काही गोष्टी आहेत, ज्या रविवारी करू नयेत. चला आम्ही तुम्हाला सांगतो रविवारी काय करणं टाळायला हवं.

1. तांबे विकणे टाळा: तांबे किंवा तांब्यापासून बनवलेली कोणतीही वस्तू रविवारी विकू नये. याशिवाय या दिवशी सूर्याशी संबंधित कोणतीही धातू किंवा वस्तू भंगार म्हणूनही विकू नये. ते अशुभ मानले जाते.

2. हार्डवेअर खरेदी करू नका: रविवारी हार्डवेअर खरेदी करणे टाळावे, असे केल्याने धनहानी होऊ शकते, असे मानले जाते.

3. काळ्या-निळ्या रंगाचे कपडे घालू नका: निळा, काळा, तपकिरी, राखाडी म्हणजेच गडद रंगाचे कपडे रविवारी घालू नयेत. काळा रंग हा शनिदेवाचा रंग मानला जातो. सूर्यदेवाचा पुत्र असूनही शनिदेवाला वडिलांची अजिबात साथ मिळत नाही. म्हणूनच रविवारी काळ्या किंवा गडद निळ्या रंगाचे कपडे घालू नयेत.

4. मांस-मदिरा सेवन करू नका: रविवारी मांस आणि मद्य सेवन करणं टाळावं.

5. पश्चिमेकडे प्रवास करू नका: धार्मिक मान्यतेनुसार, रविवारी पश्चिमेकडे प्रवास करू नये. या दिशेला प्रवास करायचा असेल तर रविवारी दलिया, तूप किंवा पान खाल्ल्यानंतर पाच पावले मागे चालत नंतर मग पूर्व दिशेला जावे. ही क्रिया केल्यानंतरच प्रवास सुरू करा.

6. घर बांधणीच्या वस्तू: रविवारी घर बांधणीच्या वस्तू कधीही खरेदी करू नका. यामुळे तुमच्या घरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात आणि तुमचे काम यशस्वी होण्यासाठी बराच वेळ लागू शकतो.

हे वाचा - रामचरितमानसच्या या ओव्यांमध्ये दिव्य शक्ती; रामाची होईल कृपा, वाढेल आत्मविश्वास

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Religion, Vastu