मराठी बातम्या /बातम्या /religion /नवरात्रीत का लावली जाते अखंड ज्योती? यामागचे शास्त्रीय महत्त्व व नियम

नवरात्रीत का लावली जाते अखंड ज्योती? यामागचे शास्त्रीय महत्त्व व नियम

नवरात्रीत संपूर्ण ९ दिवस माँ दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.

नवरात्रीत संपूर्ण ९ दिवस माँ दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.

नवरात्रीत संपूर्ण ९ दिवस माँ दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 24 मार्च:  चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला नवरात्रोत्सव साजरा केला जातो. चैत्र नवरात्रीला 22 मार्च 2023 पासून सुरुवात झाली आहे. यासोबतच हिंदू नववर्ष 2080 देखील तेव्हापासूनच सुरू झाले आहे. नवरात्रीत संपूर्ण ९ दिवस माँ दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. दरवर्षी नवरात्रीला देवीचे विशेष वाहनाने आगमन होते, याला विशेष महत्त्व आहे. यंदा नवरात्रीला माता राणी बोटीतून आली आहे. नवरात्रीत देवी दुर्गासमोर अखंड ज्योती पेटवली जाते. नवरात्रीत अखंड ज्योतीचे काही नियम आहेत. त्या नियमांचे पालन केल्यास देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो.

अखंड ज्योतीचे महत्त्व

मान्यतेनुसार घरांमध्ये कलशाची स्थापना केल्यानंतर अखंड ज्योती पेटवली जाते. अखंड ज्योती म्हणजे अशी ज्योत जी खंडित नाही. अखंड प्रकाशाने घरात समृद्धी येते आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो, भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. नवरात्रीत अखंड ज्योती विझवणे अशुभ आहे, असे म्हणतात. वेळोवेळी दिव्यात तेल टाकावे लागते आणि तसेच वाऱ्यापासूनही सुरक्षित ठेवावे लागते.

अखंड प्रकाशाचे नियम

नवरात्रीच्या काळात अखंड ज्योती पेटवण्याचा पहिला नियम असा आहे की ज्योतीची काळजी घेण्यासाठी कोणी ना कोणी असावे. ज्योती प्रज्वलित असणे म्हणजे देवी तुमच्या घरी नऊ दिवस बसलेली असते. अखंड ज्योती पेटवण्यापूर्वी मातेची पूजा करावी. दिव्यासाठी तुम्ही समईचाही वापर करू शकता.

जर तुम्ही चौरंगावर दिवा लावत असाल तर त्यावर लाल कपडा अंथरा आणि जर तुम्ही कलशाच्या वर दिवा लावत असाल तर त्याखाली गहू ठेवा. अखंड ज्योतीची ज्योत रक्षासूत्राने लावणे योग्य मानले जाते. दिवा लावण्यासाठी तूप किंवा मोहरी-तिळाचे तेल वापरता येते. अखंड ज्योती देवी दुर्गेच्या उजव्या बाजूला ठेवावी. दिव्यात मोहरीचे तेल टाकले असेल तर ते डाव्या बाजूला ठेवावे, असे म्हणतात.

अखंड ज्योती प्रज्वलित करण्यापूर्वी गणपती बाप्पा, देवी दुर्गा यांची पूजा करा आणि देवीचा मंत्र 'ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिव धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते' या मंत्राचा जप करा. अखंड ज्योतीचे वाऱ्यापासून संरक्षण करा आणि लक्षात ठेवा की अखंड ज्योती कोणत्याही परिस्थितीत नऊ दिवस विझू नये. दिव्यात तूप किंवा तेल कमी पडलं की लगेच टाकत राहा. नऊ दिवसांनी दिवा विझवू नका, तर तो आपोआप विझू द्या. या नियमाने घरात अखंड दिवा लावल्यास देवीचा आशीर्वाद मिळतो आणि घरात समृद्धी येते.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion