मराठी बातम्या /बातम्या /religion /

तिरुपती बालाजीला केसदान का केलं जातं?

तिरुपती बालाजीला केसदान का केलं जातं?

पती बालाजीच्या चरणी डोक्याचे केस दान केल्याने मनातील इच्छा पूर्ण होते, असं म्हटलं जातं.

पती बालाजीच्या चरणी डोक्याचे केस दान केल्याने मनातील इच्छा पूर्ण होते, असं म्हटलं जातं.

पती बालाजीच्या चरणी डोक्याचे केस दान केल्याने मनातील इच्छा पूर्ण होते, असं म्हटलं जातं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Prachi Dhole

मुंबई, 25 नोव्हेंबर : तिरुपती बालाजीला भगवान विष्णूंचे एक रूप मानले जाते. यांना प्रसन्न केल्यानंतर देवी लक्ष्मीची कृपा आपोआप प्राप्त होते आणि आपल्या सर्व अडचणी दूर होतात अशी भाविकांची श्रध्दा आहे. धार्मिक मान्यतेनुसार जो व्यक्ती स्वतःच्या मनामधील सर्व पाप आणि वाईट सवयी येथे सोडून देतो, त्याचे सर्व दुःख देवी लक्ष्मी नष्ट करते. यामुळे येथे स्वतःमधील सर्व वाईट सवयी आणि पापांना लोक केसाच्या रुपात सोडून जातात.

खरंतर या मागे एक पौराणिक कथा आहे. ही प्रथा कशी सुरू झाली? नीलाद्री शिखरावर विहार करताना एक दिवस बालाजी तेथे विश्रांती घेत होते. तेव्हा नीलाद्री देवी त्यांच्या पूजनासाठी तिथे आली असता त्यांनी बालाजीच्या माथ्यावर जखम असल्यामुळे तिथले केस पडले होते. तेव्हा नीलाद्री देवीने आपले केस त्या जखमांच्या निशाणावर टाकून ते घाव दिसू नये अशा प्रकारे भरून काढले.

त्यानंतर जेव्हा बालाजी झोपेतून उठले तेव्हा त्यांनी नीलाद्री देवीच्या माथ्यावरचे काढलेले केस पाहिले. आपल्या प्रति नीलाद्री देवीने दाखवलेला भक्तिभाव पाहुन बालाजी प्रसन्न झाले व त्यांनी प्रल्हाद अंबरीश आदी भक्तांचे केस नीलाद्री देवीला पुन्हा अर्पण केले आणि धन-समृद्धी प्रधान केली. त्यामुळे जो कोणी भक्त असा भक्तीभाव मनात ठेवून केस अर्पण करेल त्याचे सदैव कल्याण होईल असे वरदान दिले. तेव्हा पासून अनेक भाविक आवर्जून भक्तीभावाने आपले केस येथे अर्पण करतात. या प्रथेअंतर्गत भक्त स्वतःचे केस देवाला समर्पित करतात. याचा अर्थ असा की केसांसोबत स्वतःचा अहंकार देवाला समर्पित केला जातो.

याच प्रकारे अजून एक पौराणिक कथा आहे. लग्नासाठी बालाजीने कुबेराकडुन कर्ज घेतले होते. तेव्हा त्याने कुबेराला सांगितले की कलियुगात माझे भक्त मला सोने, चांदी, पैसे, केस वाहतील व त्यातुन मी तुझे कर्ज फेडीन. अशा प्रकारे त्याठिकाणी लोकांनी वाहिलेल्या केसांमुळे बालाजी देवस्थानाला करोडो रुपये उपलब्ध होतात. म्हणून तिरुपती मंदिरात केसदान करण्याची प्रथा आहे. मंदिराजवळ 'कल्याण कट्टा' या ठिकाणी सामूहिक रुपात केसदान केले जातात.

पती बालाजीच्या चरणी डोक्याचे केस दान केल्याने मनातील इच्छा पूर्ण होते. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू (बालाजी ) अशा भक्तांवर प्रसन्न होऊन नेहमी धन-धान्य, समृद्धी ची कृपा कायम ठेवतील. अशी भक्तांची धारणा असल्याने येथे स्त्री, पुरुष, सर्वजण केसदान करतात.

-डॉ. स्मिता राऊत

 (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Religion