Gemstone : कोणत्या बोटात कोणतं रत्न घालावं; योग्य दिवस आणि शुभ वेळ जाणून घ्या

Gemstone : कोणत्या बोटात कोणतं रत्न घालावं; योग्य दिवस आणि शुभ वेळ जाणून घ्या

ग्रहांची स्थिती संतुलित ठेवण्यासाठी विविध रत्ने घालण्याचा सल्ला दिला जातो. कोणते रत्न कोणत्या बोटात घालावे, याविषयी ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी माहिती दिली आहे, त्याविषयी जाणून घेऊया.

  • Share this:

मुंबई, 06 ऑगस्ट : ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीमधील ग्रहांची स्थिती एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील चढ-उतारांचे कारण मानली जाते. कोणत्याही ग्रहाची स्थिती उच्च किंवा चांगली असेल तर व्यक्तीच्या जीवनात यश येते आणि शुभ कार्ये होतात. दुसरीकडे ग्रहांची स्थिती दुर्बल किंवा अशुभ असेल तर अनेक कामांमध्ये अडचणी यायला सुरुवात (Gemstone) होते.

ग्रहांची स्थिती संतुलित ठेवण्यासाठी विविध रत्ने घालण्याचा सल्ला दिला जातो. कोणते रत्न कोणत्या बोटात घालावे, याविषयी ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी माहिती दिली आहे, त्याविषयी जाणून घेऊया.

कोणत्या बोटावर कोणते रत्न घालावे?

सूर्य रत्न -

रत्नशास्त्रानुसार माणिक हे सूर्याचे रत्न मानले जाते. रविवारी सूर्योदयासोबत अनामिकेत घालणे शुभ असते. हे रत्न सोन्याच्या धातूमध्ये धारण केले जाते.

चंद्र रत्न -

रत्नशास्त्रानुसार मोती हे चंद्राचे रत्न मानले जाते. चंद्रोदयाची वेळ ही धारण करण्यासाठी सर्वात शुभ वेळ आहे. करंगळीमध्ये चांदीच्या धातूमध्ये मोती घालणे शुभ मानले जाते.

मंगळाचे रत्न -

रत्नशास्त्रानुसार मूंगा हे मंगळाचे रत्न मानले जाते. संध्याकाळच्या वेळेस अनामिकेत तांबे किंवा चांदीच्या धातूमध्ये ते धारण करणे शुभ असते.

बुधाचे रत्न -

रत्नशास्त्रानुसार हिरव्या रंगाचा पन्ना हे बुद्धाचे रत्न मानले जाते. बुधवारी दुपारी 12:00 ते 2:00 या वेळेत ते धारण करणे शुभ असते. करंगळीमध्ये पन्ना धारण केला जातो.

गुरूचे रत्न -

रत्न शास्त्रानुसार पुष्कराज हे गुरूचे रत्न मानले जाते. गुरुवारी सकाळी 10:00 ते 12:00 दरम्यान तर्जनीमध्ये सोन्याच्या धातूमध्ये ते धारण करणे शुभ आहे.

हे वाचा - श्रावणात तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? शिव महादेवाचा आशीर्वाद मिळण्याचे असतात ते संकेत

शुक्राचे रत्न -

रत्नशास्त्रानुसार हिऱ्याला शुक्राचे रत्न मानले जाते. हिरा नेहमी सोन्याच्या धातूमध्ये परिधान करावा. शुक्रवारी सकाळी 10:00 ते 12:00 दरम्यान धारण करणे फायदेशीर असते.

शनीचे रत्न -

रत्न शास्त्रानुसार नीलम हे शनीचे रत्न मानले जाते. शनिवारी मधल्या बोटात घालणे शुभ असते.

हे वाचा - श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे

राहू-केतू रत्न -

रत्नशास्त्रानुसार, राहू-केतूसाठी शनिवारी मधल्या बोटात गोमेद धारण करावे. हे रत्न सुलेमानी हकीक, हकीक, अकीक आणि अगेत या नावांनीही ते लोकप्रिय आहेत. हकीक हा अनेक ग्रहांचा उपरत्न आहे. राहू-केतू आणि शनीचे दोष कमी करण्यासाठी तो उपयुक्त ठरतो.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Published by: News18 Desk
First published: August 6, 2022, 8:00 PM IST

ताज्या बातम्या