मराठी बातम्या /बातम्या /religion /

नवरात्रीमध्ये 9 रंगांचे विशेष महत्त्व; जाणून घ्या यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग?

नवरात्रीमध्ये 9 रंगांचे विशेष महत्त्व; जाणून घ्या यंदा कोणत्या दिवशी कोणता रंग?

यावर्षीच्या नवरात्रीच्या रंगांची यादी खाली दिली आहे. या नवरात्रोत्सवादरम्यान कोणत्या दिवशी कोणते रंग घालावेत आणि नवरात्रीतील त्यांचे महत्त्व याविषयी जाणून घेऊया.

यावर्षीच्या नवरात्रीच्या रंगांची यादी खाली दिली आहे. या नवरात्रोत्सवादरम्यान कोणत्या दिवशी कोणते रंग घालावेत आणि नवरात्रीतील त्यांचे महत्त्व याविषयी जाणून घेऊया.

यावर्षीच्या नवरात्रीच्या रंगांची यादी खाली दिली आहे. या नवरात्रोत्सवादरम्यान कोणत्या दिवशी कोणते रंग घालावेत आणि नवरात्रीतील त्यांचे महत्त्व याविषयी जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 27 सप्टेंबर : गणेशोत्सव संपल्यानंतर सगळ्यांनाच वेध लागतात ते नवरात्री उत्सवाचे. विशेषतः स्त्रिया नवरात्री उत्सव आनंदाने साजरा करतात. नवरात्रीमध्ये नऊ दिवसाचे नऊ रंग ही परंपरा महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये खूप लोकप्रिय आहे. अनेक भाविक या काळात उपवास करतात आणि नवरात्रीमध्ये त्या दिवसाच्या रंगानुसार कपडे घालतात. स्त्रिया या परंपरेचे मोठ्या प्रमाणावर पालन करतात आणि नवरात्रीच्या रंगानुसार मेकअप करतात. यावर्षीच्या नवरात्रीच्या रंगांची यादी खाली दिली आहे. या नवरात्रोत्सवादरम्यान कोणत्या दिवशी कोणते रंग घालावेत आणि नवरात्रीतील त्यांचे महत्त्व याविषयी जाणून घेऊया.

नवरात्रीचे रंग, तारखा आणि महत्त्व

घटस्थापना/प्रतिपदा, दिवस 1 - सप्टेंबर 26, (सोमवार)

नवरात्रीचा दिवसाचा रंग - पांढरा

26 सप्टेंबरला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाईल. सोमवारी पांढरा रंग खूप शुभ मानला जातो. देवी शैलपुत्रीला पांढरा रंग खूप आवडतो. पांढरा रंग पवित्रता आणि शांततेचे प्रतीक आहे. तो परिधान केल्याने आत्मविश्वास वाढतो.

द्वितीया, दिवस 2 - सप्टेंबर 27, (मंगळवार)

नवरात्री द्वितीया तिथी (लाल) -

शारदीय नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी, 27 सप्टेंबर 2022 रोजी मंगळवारी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाईल. या दिवशी लाल रंगाचा वापर करणे शुभ मानले जाते. लाल रंग धैर्य, पराक्रम आणि प्रेमाचे प्रतीक आहे.

तृतीया, दिवस 3 - सप्टेंबर 28, (बुधवार)

नवरात्री तृतीया तिथी (नारंगी) -

शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस चंद्रघंटा मातेला समर्पित आहे. बुधवार, 28 सप्टेंबर 2022 रोजी चंद्रघंटा मातेच्या पूजेमध्ये केशरी (नारंगी) रंगाचे कपडे घाला. केशरी रंग सकारात्मक ऊर्जा देतो.

चतुर्थी, दिवस 4 - सप्टेंबर 29, (गुरुवार)

नवरात्रीचा दिवसाचा रंग - पिवळा

29 सप्टेंबर 2022 रोजी, नवरात्रीच्या चौथ्या दिवशी, गुरुवारी देवी कुष्मांडाची पूजा केली जाईल. या दिवशी पिवळा रंग खूप शुभ मानला जातो. पिवळा रंग उत्साहाचे प्रतीक आहे.

पंचमी, दिवस 5 - सप्टेंबर 30, (शुक्रवार)

नवरात्रीचा दिवसाचा रंग - हिरवा

शारदीय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी 30 सप्टेंबर 2022 रोजी शुक्रवारी देवी स्कंदमातेची पूजा करतात. पाचव्या दिवशी हिरवा रंग वापरल्याने उत्साही राहण्यास मदत होईल. हिरवा रंग तुम्हाला काहीतरी नवीन करून पाहण्याची प्रेरणा देतो.

षष्ठी, दिवस 6 - ऑक्टोबर 1, (शनिवार)

नवरात्रीचा दिवसाचा रंग - राखाडी

नवरात्री षष्ठी तिथी 1 ऑक्टोबर 2022 शनिवार म्हणजेच सहाव्या दिवशी कात्यानी मातेची पूजा केली जाईल. नवरात्रीच्या या राखाडी किंवा तपकिरी रंग हा दुष्टांचा नाश करणारा मानला जातो.

सप्तमी, दिवस 7 - 2 ऑक्टोबर, (रविवार)

नवरात्रीचा दिवसाचा रंग - केशरी

शारदीय नवरात्रीचा सातवा दिवस देवी कालरात्रीला समर्पित आहे. 2 ऑक्टोबर 2022 रोजी देवी कालीच्या पूजेत निळ्या रंगाचा वापर शुभ मानला जातो. निळा रंग निर्भयता दर्शवतो.

हे वाचा -  कोणतंही रत्न धारण करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी, फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं

अष्टमी, दिवस 8 - 3 ऑक्टोबर, (सोमवार)

नवरात्रीचा दिवसाचा रंग - जांभळा

नवरात्रीच्या आठव्या दिवशी सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 रोजी महाअष्टमीला देवी महागौरीची पूजा केली जाते. महागौरीला जांभळा रंग आवडतो. या दिवशी बालिकेची पूजा करण्याचा नियम आहे.

हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान

नवमी, दिवस 9 - 4 ऑक्टोबर, (मंगळवार)

नवरात्रीचा दिवसाचा रंग - गुलाबी

4 ऑक्टोबर 2022 रोजी शारदीय नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी देवी सिद्धीदात्रीची पूजा केली जाईल. सिद्धिदात्री देवी विद्येची देवी मानली जाते, या दिवशी गुलाबी रंग वापरा. गुलाबी रंग प्रेम आणि नारीत्वाचा मानक आहे.

First published:

Tags: Navratri, Religion