मराठी बातम्या /बातम्या /religion /

Jyeshtha Gauri Pujan 2022 : कधी आहे ज्येष्ठा गौरी पूजन? येथे पाहा तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्व

Jyeshtha Gauri Pujan 2022 : कधी आहे ज्येष्ठा गौरी पूजन? येथे पाहा तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्व

ज्येष्ठा गौरी पूजन शुभ मुहूर्त

ज्येष्ठा गौरी पूजन शुभ मुहूर्त

ज्येष्ठा गौरी सण प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जातो. तीन दिवस चालणारा हा उत्सव विवाहित महिला मोठ्या उत्साहात साजरा करतात. पहिल्या दिवशी जेष्ठा गौरी आवाहन असते. दुसऱ्या दिवशी गौरी पूजन आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 25 ऑगस्ट : पौराणिक मान्यतांनुसार गणपतीला प्रथम पूजनिय म्हटले जाते. सर्वप्रथम गणेशाची पूजा केल्यानंतरच इतर देवी-देवतांची पूजा केली जाते. त्यामुळे श्री गणेशाची माता गौरीची पूजा करण्यापूर्वीही श्री गणेशाची पूजा केली जाते. दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवा दरम्यान माता गौरीचीही पूजा केली जाते. यंदा 31 ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. त्यानंतर तीन दिवसांनी दिवसांनंतर म्हणजेच 3 सप्टेंबरला ज्येष्ठा गौरीची स्थापना करण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरी पूजन केले जाते आणि तिसऱ्या दिवशी ज्येष्ठा गौरींना निरोप देऊन विसर्जन केले जाते.

काय आहे महत्त्व?

पौराणिक कथेनुसार राक्षसांच्या अत्याचाराला कंटाळून आणि त्यांच्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी महिलांनी देवी पार्वतीला आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माता पार्वतीने भाद्रपद शुक्ल अष्टमीला राक्षसांचा वध करून पृथ्वीवरील प्राणिमात्रांचे दुःख नाहीसे केले. त्यामुळे सर्व स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी भाद्रपद शुक्ल अष्टमीला ज्येष्ठ गौरीचे व्रत करतात. गौरी हे माता पार्वतीचे दूसरे नाव आहे. जेष्ठ नक्षत्रादरम्यान हा उत्सव येतो त्यामुळे त्याला जेष्ठा गौरी पूजन म्हटले जाते. ज्येष्ठा गौरी पूजन हा महाराष्ट्रातील लोकप्रिय सणांपैकी एक महत्वाचा सण आहे.

Vastu Tips : घराच्या अंगणात 'या' दिशेला लावा पारिजाताचे रोप, सुखसमृद्धीचा होईल वर्षाव

कसे साजरे केले जातो सण?

ज्येष्ठा गौरी सण प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जातो. तीन दिवस चालणारा हा उत्सव विवाहित महिला मोठ्या उत्साहात साजरा करतात. पहिल्या दिवशी जेष्ठा गौरी आवाहन असते. या दिवशी शुभ मुहूर्तावर माता गौरीची स्थापना केली जाते. त्यासाठी विविध वस्तूंचा वापर करून सजावट केली जाते. धान्यांच्या राशी लावल्या जातात आणि विविध प्रकारची फळे गौरींपूढे ठेवली जातात. दुसऱ्या दिवशी गौरी पूजन असते. यादिवशी गौरींसाठी विविध प्रकारच्या अन्नांचा नैव्यद्य बनवला जातो. माता गौरीला 16 भाज्या, 16 कोशिंबीर, 16 चटण्या, 16 पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. यानंतर 16 दिव्यांनी मातेची आरती केली जाते आणि तिसऱ्या दिवशी गौरींना निरोप देऊन त्यांचे विसर्जन करण्यात येते. राज्याच्या वेगवेगळ्या भागात हा उत्सव साजरा करण्यच्या प्रथा थोड्याफार प्रमाणात वेगवेगळ्या आहेत.

Astro Tips: नशीब कधीही दगा नाही देणार, हे 5 ज्योतिषीय उपाय नियमित करून बघा

यंदा गौरी स्थापनेची तिथी आणि शुभ मुहूर्त

ज्येष्ठा गौरी आवाहन : 3 सप्टेंबर 2022, शनिवार रात्री 10:56 पर्यंत

ज्येष्ठा गौरी पूजन : 4 सप्टेंबर 2022, रविवार

ज्येष्ठा गौरी विसर्जन : 5 सप्टेंबर 2022, सोमवार, रात्री 08:05 पर्यंत

First published:

Tags: Lifestyle, Religion