गर्भधारणेच्या नियोजनासाठी ज्योतिषशास्त्राची मदत; जवळ येण्याचीही आहे वेळ, काय आहे नवा ट्रेंड?

गर्भधारणेच्या नियोजनासाठी ज्योतिषशास्त्राची मदत; जवळ येण्याचीही आहे वेळ, काय आहे नवा ट्रेंड?

बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेतलेली ही चांगली जोखीम असल्याचं काही लोकांनी म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : भारतात ज्योतिषशास्त्राला (Jyotish Shastra) विशेष महत्त्व दिलं जातं. देशातल्या लोकांचा ग्रह (Planet) आणि नक्षत्रांवर आधारित ज्योतिषशास्त्रावर खूप विश्वास आहे. आपलं नशीब उजळावं यासाठी लोक आपल्या नावापासून अनेक गोष्टींमध्ये बदल करतात. अनेक लोक रत्नांच्या अंगठ्या वापरण्यासह विविध उपाय करतात.

गुड लकसाठी (Good Luck) या सर्व गोष्टी केल्या जातात. पण अशी अंधश्रद्धा केवळ भारतीयांमध्येच आहे, असा विचार तुम्ही करत असाल तर तो चुकीचा आहे. अशा प्रकारचा विश्वास जगभरातल्या अन्य लोकांमध्येही आहे. अशाच काही लोकांनी त्यांचे अनुभव सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले आहेत. काही महिलांनी त्यांच्या गर्भधारणेच्या (Pregnancy) नियोजनाची कहाणी सोशल मीडियावर शेअर केली आहे. यातील काही महिलांनी ग्रह-नक्षत्र पाहून गर्भधारणेचं नियोजन केलं होतं. या नियोजनात काही महिला यशस्वी ठरल्या तर काहींची फसगत झाली.

अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवात ही राशिभविष्य (Horoscope) वाचून होते. आपला आजचा दिवस कसा असेल, ही उत्सुकता या लोकांमध्ये असते. राशी भविष्यानुसार हे लोक त्यांच्या संपूर्ण दिवसाचं प्लॅनिंग करतात. जर तुमचे कोणाशी मतभेद होऊ शकतात, असं या लोकांच्या राशी भविष्यात लिहिलं असेल तर ते दिवसभर मूड शांत ठेवण्याचा प्रयत्नदेखील करतात. जर राशी भविष्यात दुर्घटना किंवा अपघाताची शक्यता वर्तवली असेल तर ते घराबाहेर पडणंही टाळतात; पण बऱ्याचदा सर्व गोष्टी नियोजनानुसार करूनही त्या मनासारख्या होत नाहीत. अशाच काही लोकांनी आपल्यासोबत राशी भविष्य, ग्रह-नक्षत्रांच्या अनुषंगाने झालेल्या फसगतीची (Cheating) कहाणी सोशल मीडियावर शेअर केली आहे. विशेष म्हणजे, राशी भविष्याच्या आधारे आपल्या गर्भधारणेचं नियोजन करणाऱ्या काही महिलांचाही समावेश आहे.

झाला आहे एक नवीन ट्रेंड

news.com.au च्या वृत्तानुसार, सध्या लोकांमध्ये एक नवा ट्रेंड (Trend) दिसून येत आहे. या ट्रेंडमध्ये कपल्स ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन गर्भधारणेचं नियोजन करत आहेत. मूल योग्यवेळी जन्माला यावं, जन्माला आल्यानंतर त्याच्या कुंडलीत सर्व ग्रह उत्तम असावेत, तसंच भविष्यात त्याला कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये, या दृष्टिकोनातून ते ग्रहांच्या स्थितीनुसार गर्भधारणेचं नियोजन करत आहे. रेडिटवर (Reddit) अनेक महिलांनी ही गोष्ट मान्य केली आहे. कोणी मुलाच्या भविष्यासाठी ग्रह, नक्षत्रांनुसार गर्भधारणेचं नियोजन केलं आहे का असा प्रश्न रेडिटवर एका महिलेनं विचारला असता, याबाबत खुलासा झाला.

अनेकांची झाली फसगत

या प्रश्नाच्या उत्तरात अनेक महिलांनी याला सहमती दर्शवली. हा प्रश्न विचारणाऱ्या महिलेनं पुढं लिहिलं आहे की, काहीही झालं तरी माझा चांगल्या संकल्पनेवर विश्वास आहे. परंतु, बाळासाठी तिनंदेखील हाच ट्रेंड वापरला आहे. या थ्रेडवर अल्पावधीच अनेक लोक प्रतिक्रिया देण्यासाठी सरसावले. आम्ही असं केल्याचं अनेक लोकांनी कबूल केलं आहे. परंतु, काही लोकांच्या मते, सर्व गोष्टींचं नियोजन करूनही अनेक महिलांनी चुकीच्या नक्षत्रावर बाळाला (Child) जन्म दिला आहे. यामागे प्री-मॅच्युअर डिलिव्हरीपासून ते इतर गुंतागुंतीपर्यंत अनेक कारणं आहेत. तथापि, बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेतलेली ही चांगली जोखीम असल्याचं काही लोकांनी म्हटलं आहे.

First published: August 8, 2022, 11:26 PM IST

ताज्या बातम्या