मुंबई, 22 मार्च : महाराष्ट्राचा मोठा सण गुढीपाडवा या वर्षी 22 मार्च रोजी आहे. हा सण दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला साजरा केला जातो. असे मानले जाते की गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच वर्ष प्रतिपदेला ब्रह्मदेवाने जगाची निर्मिती केली. त्यामुळे हा दिवस 'नव संवत्सर' म्हणजेच नवीन वर्ष म्हणूनही साजरा केला जातो.
मराठीतील सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे 'गुढीपाडवा' हा महान सण, जो हिंदू दिनदर्शिकेनुसार वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो. पंचांगानुसार चैत्र महिना हा वर्षाचा पहिला महिना आहे. यावर्षी प्रतिपदा 22 मार्च रोजी आहे, त्या दिवसापासून चैत्र महिन्यातील नवरात्रीला सुरुवात होत आहे.
या खास सणाच्या दिवशी घरातील महिला नवीन वर्षाप्रमाणे घर स्वच्छ करतात आणि सुंदर रांगोळीही काढतात. पूजेत वापरल्या जाणार्या आंब्याच्या पानांपासून तोरण बनवून लोक दाराला बांधतात. परंपरेनुसार गुढीपाडव्याला महिला घरावर गुढी उभारतात.
कडुनिंबाचे महत्त्व
गुढीपाडव्याला लोक सर्वप्रथम कडुलिंबाचा फुलोरा खातात. कडुलिंबाच्या फुलोरा तसेच पाने सेवन केल्याने रक्त शुद्ध होते आणि व्यक्ती रोगांपासून मुक्त राहते असे म्हणतात. अशा परिस्थितीत कडुलिंबाच्या पानांचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. जाणून घ्या, या दिवशी कडुलिंब का खावा...
गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या रसाचे सेवन केले जाते. मंदिरात जाणाऱ्याला प्रसाद म्हणून कडुलिंब आणि साखर मिळते.
कडुलिंब चवीला कडू आहे, पण आरोग्यदायी आहे. सुरुवातीला चव आवडत नसली तरी त्यामुळे आरोग्य मात्र चांगले होते. जे कडुलिंबाचे नियमित सेवन करतात ते कायम निरोगी राहतात.
कडुनिंबापासून आपल्याला शिकवणही मिळते की, जीवनात अनेक विचार आचरणात आणण्यासाठी कटु वाटतात, परंतु तेच विचार जीवनाला उदात्तही बनवतात.
अशा सुंदर, पुण्यपूर्ण विचारांचे सेवन करणाऱ्याला मानसिक आणि बौद्धिक आरोग्य प्राप्त होते. त्याचे जीवन निरोगी होते. प्रगतीच्या वाटेवर जीवनात किती 'कडू घोट' प्यावे लागतात, याचेही दर्शन घडते.
मंदिरात मिळणाऱ्या कडुलिंबाच्या आणि साखरेच्या प्रसादामागे खूप गोड भावना दडलेली असते. जीवनात सुख किंवा दु:ख कधीच एकटे येत नाही. सुखाच्या पाठोपाठ दुःख आणि दुःखाच्या पाठोपाठ सुख येत असते, हेही यातून दर्शवण्यात आले आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Gudi Padwa 2023, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion