मराठी बातम्या /बातम्या /religion /

'पंचक'मध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास काय करावं? अंत्यसंस्कारावेळी करा हे काम

'पंचक'मध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास काय करावं? अंत्यसंस्कारावेळी करा हे काम

पंचकमध्ये मृत्यू झाल्यास काय करावे

पंचकमध्ये मृत्यू झाल्यास काय करावे

ज्योतिषशास्त्रात हा काळ अशुभ मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार पाच नक्षत्रांच्या संयोगाला पंचक म्हणतात. पंचक काळात कोणाचा मृत्यू होणंही अशुभ मानलं जातं. त्यामुळे आणखी 5 लोकांचा मृत्यू होण्याची भीती असते, त्यावरील उपाय जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 01 डिसेंबर : हिंदू धर्मात जन्मापासून ते मृत्यूपर्यंत शुभकाळांचे महत्त्व मानले गेले आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या सर्व कामांमध्ये मुहूर्ताचा संबंध निरंतर असतो. कोणत्याही विशेष कार्यासाठी पंचांगाद्वारे निश्चित केलेल्या शुभ कालावधीला मुहूर्त म्हणतात. कोणतेही कार्य करण्यासाठी ती वेळ योग्य आहे की नाही याची माहिती ज्योतिषशास्त्रात मिळते. ज्योतिषी ग्रह-नक्षत्रांची गणना त्यांच्या विशेष ज्ञानाच्या आधारे करतात. अशुभ मानल्या जाणाऱ्या पंचक काळाविषयी आज आपण माहिती जाणून घेऊ.

पंचक म्हणजे काय?

पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, काही ठराविक काळ असा असतो की, त्यामध्ये कोणतंही काम केलं तरी त्यामध्ये यश मिळत नाही, ते काम पूर्ण होत नाही. अशा काळापैकी एक म्हणजे पंचक काळ. बहुतेक लोकांना ग्रह आणि नक्षत्रांबद्दल माहिती असते, परंतु पंचकबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. ज्योतिषशास्त्रात हा काळ अशुभ मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार पाच नक्षत्रांच्या संयोगाला पंचक म्हणतात. ही पाच नक्षत्रे म्हणजे घनिष्ठा, शतभिषा, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा आणि रेवती. हा अशुभ आणि हानिकारक नक्षत्रांचा संयोग मानला जातो.

पंचकामध्ये काय करू नये -

पंचक काळात गवत, लाकूड इत्यादी इंधन गोळा करू नये, त्यामुळे आग लागण्याची भीती असते. तसेच या काळात दक्षिण दिशेला प्रवास करू नये, कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. याकाळात दक्षिण दिशेला प्रवास करणे हानिकारक मानले जाते.

ज्योतिष शास्त्रानुसार पंचक काळात घराचे छत बांधू नये, यामुळे धनाची हानी होते आणि घरात संकटे येतात. पंचकमध्ये खाट बनवणे देखील अशुभ मानले जाते. जाणकारांच्या मते असे केल्याने मोठे संकट निर्माण होऊ शकते. पंचकादरम्यान कोणाचा मृत्यू झाला तर शक्य असल्यास पंचक संपल्यावर अंत्यसंस्कार करावेत. पंचकमध्ये मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याने त्या कुटुंबातील आणखी पाच जणांचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त केली जाते.

उपाय काय -

काही कारणास्तव जर या काळात काही कामे पूर्ण करणे खूप महत्त्वाचे असेल तर असे काही उपाय आहेत, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमचे महत्त्वाचे काम करू शकता. पंचकच्या दिवशी घराचे छप्पर घालणे आवश्यक असल्यास, अशा वेळी मजुरांना मिठाई खाऊ घाला, त्यानंतर छप्पर घालण्याचे काम करा.

जर घरामध्ये लग्नाच्या शुभ मुहूर्ताची तारीख आली असेल आणि वेळेची कमतरता असेल किंवा लाकडी वस्तू खरेदी करणे आवश्यक आहे, तर तुम्ही माता गायत्री हवन करून लाकडी फर्निचर खरेदी करू शकता. पंचकमध्ये इंधन गोळा करणे आवश्यक असल्यास, शिवमंदिरात पंचमुखी दीपक (पिठाचा दीप, तेलाने भरलेला) जाळावा, त्यानंतर इंधन खरेदी करा.

पंचक काळात काही कारणास्तव दक्षिण दिशेला प्रवास करावा लागत असेल तर हनुमान मंदिरात 5 फळे अर्पण करून यात्रा करावी. गरुड पुराणात असे वर्णन आहे की, पंचकमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास पिठाच्या कणकेच्या बनवलेल्या पाच पुतळ्या मृतदेहासोबत सरणावर ठेवाव्यात आणि या पाच मृतदेहांचे पूर्ण विधीपूर्वक अंत्यसंस्कार करून पंचक दोष संपतो.

वाचा - 'चोर' ते 'रोग'.. पंचकाचे आहेत इतके प्रकार; अग्नी पंचकात का टाळावीत शुभ कार्ये?

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Religion