मराठी बातम्या /बातम्या /religion /गोत्र म्हणजे काय? त्याचं महत्त्व काय, एकाच गोत्रात लग्न का करायचं नसतं?

गोत्र म्हणजे काय? त्याचं महत्त्व काय, एकाच गोत्रात लग्न का करायचं नसतं?

गोत्र म्हणजे काय?

गोत्र म्हणजे काय?

पूर्वीच्या काळी गोत्राचा संबंध फक्त ऋषीमुनींशीच होता, पण आजच्या युगात गोत्र हिंदूचा वर्ग, जात, प्रदेश आणि स्थान प्रतिबिंबित करते. गोत्र हा प्राचीन मानवी समाजाने निर्माण केलेल्या रूढींचा एक भाग आहे.

मुंबई, 27 मे : हिंदू धर्मात प्रत्येक व्यक्तीचे गोत्र अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आजच्या बदलत्या काळात आधुनिक तरुणांना गोत्र समजत नाही, त्यात रसही नाही, पण धार्मिक कार्य करताना गोत्राचे महत्त्व वाढते. विशेषतः लग्नाच्या वेळी वधू-वरांची गोत्र निश्चितपणे विचारले जाते. गोत्राचे महत्त्व सांगताना ते हिंदू धर्माच्या ओळखीसाठी/ अस्मितेसाठी बनवल्याचे सांगितले जाते. पूर्वीच्या काळी गोत्राचा संबंध फक्त ऋषीमुनींशीच होता, पण आजच्या युगात गोत्र हिंदूचा वर्ग, जात, प्रदेश आणि स्थान प्रतिबिंबित करते. गोत्र हा प्राचीन मानवी समाजाने निर्माण केलेल्या रूढींचा एक भाग आहे. जे ठरवते, एखादी व्यक्ती कोणत्या पूर्वजाचे मूल आहे. ज्योतिषी आणि वास्तुतज्ज्ञ पंडित हितेंद्रकुमार शर्मा सांगत आहेत हिंदू धर्मात किती गोत्र आहेत आणि त्यांचे महत्त्व काय आहे.

गोत्र म्हणजे काय?

हिंदू धर्मात गोत्र हे ऋषी परंपरेशी संबंधित मानले जाते. ब्राह्मणांसाठी गोत्र हे विशेष महत्त्वाचे आहे. प्रत्येक ब्राह्मणाचे नाते हे ऋषी कुळातील मानले जाते. प्राचीन काळी 4 ऋषींच्या नावाने गोत्र परंपरा सुरू होती.

हे चार ऋषी म्हणजे अंगिरा, कश्यप, वशिष्ठ आणि भृगु. गोत्र हा एक संस्कृत शब्द आहे ज्यामध्ये "गो" म्हणजे आपल्या इंद्रियांमधून काढून टाकणे आणि "त्र" म्हणजे संरक्षण होय. प्राचीन काळी केवळ चार गोत्रांचा विचार केला जात असे, परंतु नंतर आणखी चार गोत्रांचाही समावेश करण्यात आला, ती पुढीलप्रमाणे – अत्री, जन्मदग्नी, अगस्त्य आणि विश्वामित्र.

शुक्र-मंगळ एकत्र येत असल्यानं दुहेरी लाभ; या 4 राशीच्या लोकांसाठी हा सुखाचा काळ

एकाच गोत्रात लग्न का होत नाही?

हिंदू धर्मात लग्नादरम्यान वधू-वरांना त्यांच्या गोत्राबद्दल विचारले जाते. यामागचे कारण म्हणजे वधू आणि वर दोघेही एकाच गोत्राचे नसावेत. हिंदू धर्मात एकाच गोत्रात विवाह करण्यास मनाई आहे. पौराणिक मान्यतेनुसार गोत्र ऋषीमुनींशी संबंधित मानले जाते. ते ऋषी त्या गोत्रातील पुरूष किंवा स्त्रीचे पूर्वज मानले जातात. सर्व लोक एकाच गोत्रात येतात. ते एकमेकांचे भाऊ-बहीण आहेत. या कारणास्तव एकाच गोत्रात विवाह निषिद्ध मानला जातो.

Numerology: विश्वास पात्र असतात अशा व्यक्ती; निष्ठावान जोडीदारही बनू शकतात

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Life18, Lifestyle, Marriage, Religion, Religion18