मराठी बातम्या /बातम्या /religion /कुंडलीत दरिद्र योग असेल तर प्रयत्नांना नाही मिळत यश; या उपायांनी होईल सुरळीत सगळं

कुंडलीत दरिद्र योग असेल तर प्रयत्नांना नाही मिळत यश; या उपायांनी होईल सुरळीत सगळं

दरिद्र योग

दरिद्र योग

जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत दरिद्र योग तयार झाला तर त्याला आयुष्यभर अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशा लोकांकडून केलेली कामे बिघडतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 01 एप्रिल : एखाद्या व्यक्तीचा जन्म होतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या कुंडलीत काही योग तयार होतात. या योगांचे त्या व्यक्तीला आयुष्यात चांगले किंवा वाईट परिणाम मिळतात. ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक व्यक्तीचे भाग्य त्याच्या कुंडलीत लिहिलेले असते. जर एखाद्या व्यक्तीच्या नशिबात समस्या लिहिल्या असतील तर त्याला आयुष्यभर अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुभ योग असतील तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रगती होते आणि अपार यश, संपत्ती आणि कीर्ती प्राप्त होते, परंतु जर अशुभ योग तयार होत असतील तर त्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्य संघर्षात जाते. ज्योतिषशास्त्रात याला दरिद्र योग म्हणतात.

असे मानले जाते की, जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत दरिद्र योग तयार झाला तर त्याला आयुष्यभर अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशा लोकांकडून केलेली कामे बिघडतात. पण, ज्योतिष शास्त्रात यावर काही उपायही सांगितले आहेत, ज्याचा वापर करून गरिबीचे योग दूर केले जाऊ शकतात. भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तुतज्ज्ञ पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत.

दरिद्र योग कधी आणि कसा तयार होतो?

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखादा शुभ ग्रह अशुभ ग्रहाच्या संपर्कात येतो तेव्हा दरिद्र योग तयार होतो. गुरू 6 व्या ते 12व्या घरात असतील तरीही दारिद्र्य योग निर्माण होतो. याशिवाय जेव्हा केंद्रस्थानी शुभ योग असतो आणि धनाच्या घरात अशुभ ग्रह बसलेला असतो, तेव्हा गरिबीचा योग तयार होऊ शकतो. चंद्रापासून चतुर्थ स्थानात अशुभ ग्रह असल्यासही दरिद्र योगही तयार होतो.

दरिद्र योग टाळण्याचे उपाय -

ज्योतिषशास्त्रामध्ये दरिद्र योग टाळण्यासाठी काही उपाय देखील सांगण्यात आले आहेत.

1. ज्योतिषी मानतात की काही विशेष उपाय करून तुम्ही दरिद्र योगाचे दुष्परिणाम टाळू शकता. यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक लावावे.

2. तीन धातूंनी बनवलेली अंगठी मधल्या बोटात घालावी किंवा तीन धातूंनी बनलेले कडे/बांगडीही हातात घातली जाऊ शकते.

3. दरिद्र योगासाठी गजेंद्र मोक्षाचे पठण करा.

5. याशिवाय दरिद्र योगाच्या नाशासाठी गीतेच्या 11 अध्यायांचे पठण सर्वोत्तम मानले जाते.

हे वाचा - रामचरितमानसच्या या ओव्यांमध्ये दिव्य शक्ती; रामाची होईल कृपा, वाढेल आत्मविश्वास

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Religion, Vastu