मराठी बातम्या /बातम्या /religion /

स्वप्नात जळणारा किंवा विझलेला दिवा दिसण्याचा काय अर्थ? भविष्याचे मिळतात असे संकेत

स्वप्नात जळणारा किंवा विझलेला दिवा दिसण्याचा काय अर्थ? भविष्याचे मिळतात असे संकेत

काही स्वप्ने (Swapna Shastra) आपल्याला आठवतात आणि काही स्वप्ने आपण लगेच विसरुनही जातो. स्वप्नात काय दिसू शकेल हे, समजणे माणसाच्या सामर्थ्यात नाही.

काही स्वप्ने (Swapna Shastra) आपल्याला आठवतात आणि काही स्वप्ने आपण लगेच विसरुनही जातो. स्वप्नात काय दिसू शकेल हे, समजणे माणसाच्या सामर्थ्यात नाही.

काही स्वप्ने (Swapna Shastra) आपल्याला आठवतात आणि काही स्वप्ने आपण लगेच विसरुनही जातो. स्वप्नात काय दिसू शकेल हे, समजणे माणसाच्या सामर्थ्यात नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 01 सप्टेंबर : झोपेत असताना व्यक्ती आपल्या अवचेतन मनात (सबकॉन्शियस माइंड) असलेल्या गोष्टी स्वप्नांच्या रूपात पाहतो. कधीकधी ही स्वप्ने चांगली असतात तर कधी ती खूप भयानक आणि वाईटही असतात. स्वप्न शास्त्रानुसार प्रत्येक स्वप्न व्यक्तीला येणाऱ्या भविष्याचे संकेत देते. काही स्वप्ने (Swapna Shastra) आपल्याला आठवतात आणि काही स्वप्ने आपण लगेच विसरुनही जातो. स्वप्नात काय दिसू शकेल हे, समजणे माणसाच्या सामर्थ्यात नाही. आज भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा आपल्याला स्वप्नात जळणारा आणि विझलेला दिवा पाहण्याचा अर्थ आणि संकेत सांगत (Dream Interpretation) आहेत.

- स्वप्नात जळता दिवा पाहणे

स्वप्न शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात जळणारा दिवा दिसला तर तो त्याच्यासाठी शुभ संकेत असतो. जळता दिवा पाहणे म्हणजे आगामी काळात तुमची मान-प्रतिष्ठा वाढणार आहे. याशिवाय समाजात तुमच्या कुटुंबाचा दर्जा वाढू शकतो.

स्वप्नात जळणता दिवा दिसणे हे राजयोग बनण्याचे लक्षण आहे. जळता दिवा तुमच्या पुढच्या पदाच्या प्राप्तीचा योगही निर्माण करतो. जसा जळणारा दिवा अंधार दूर करून प्रकाश पसरवतो, त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातून अपयश दूर होणार आहे आणि लवकरच तुमचा यशाचा मार्ग खुला होणार आहे, असा त्याचा अर्थ होतो.

- स्वप्नात अखंड ज्योत जळताना पाहणे

स्वप्न शास्त्रात असे सांगितले आहे की, जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात जळत असलेली अखंड ज्योत दिसली तर ती व्यक्ती दीर्घायुष्यी होणार आहे, असे समजावे. येणाऱ्या भविष्यात त्याला आरोग्यविषयक समस्यांपासून मुक्ती मिळते.

हे वाचा -  नखांच्या आकारावरूनही समजतं स्वभाव आणि बरंच काही, या टिप्स वापरून ओळखा

- स्वप्नात विझलेला दिवा पाहणे

ज्याप्रमाणे स्वप्नात जळणारा दिवा दिसणे हे शुभ लक्षण आहे, त्याचप्रमाणे स्वप्नात विझलेला दिवा दिसला तर ते अशुभ स्वप्न मानले जाते. तुमची इच्छाशक्ती कमकुवत होत असल्याचे ते संकेत आहे. यामुळे तुम्ही एखादे काम करताना मेहनत घेतली तरी त्या कामात तुमच्या मेहनतीनुसार फळ मिळणार नाही.

हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान

तुमच्या स्वप्नातील विझलेला दिवा सूचित करतो की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्यामध्ये तुम्हाला अपयशाला सामोरे जावे लागणार आहे. याशिवाय, हे स्वप्न खराब आरोग्याचे संकेत देणारे असू शकते.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Religion