मराठी बातम्या /बातम्या /religion /मेष राशीच्या लोकांनी या आठवड्यात नवीन संधीसाठी तयार रहा,अजून कोणत्या राशी आहेत खास

मेष राशीच्या लोकांनी या आठवड्यात नवीन संधीसाठी तयार रहा,अजून कोणत्या राशी आहेत खास

 सप्ताहाच्या सुरवातीला चंद्र वृषभ राशीत उच्च असून शुभ फळ देईल.

सप्ताहाच्या सुरवातीला चंद्र वृषभ राशीत उच्च असून शुभ फळ देईल.

सप्ताहाच्या सुरवातीला चंद्र वृषभ राशीत उच्च असून शुभ फळ देईल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 जानेवारी: आज दिनांक २९ जानेवारी २०२३ रविवार.आज माघ शुक्ल अष्टमी. या सप्ताहात शनि कुंभ राशीत तर गुरू मीन राशीत असेल. राहू केतू अनुक्रमे मेष व तुला राशीत असतील. शुक्र कुंभेत तर रवि मकर राशीत असून बुध धनू राशीत गोचर करेल. सप्ताहाच्या सुरवातीला चंद्र वृषभ राशीत उच्च असून शुभ फळ देईल. मंगळ देखील वृषभ राशीत असेल. या ग्रहस्थिती नुसार पाहूया या आठवड्याचे राशी भविष्य .

मेष

राशी स्वामी मंगळ अजूनही द्वितीय स्थानात असून

धन कुटुंब आणि सामाजिक जीवनात अनेक नवीन संधी चालून येतील.बोलण्यावर नियंत्रण ठेवा. राशीतील राहू एक प्रकारे भय निर्माण करेल.कमरेचे वा तत्सम गुह्य विकार त्रास देतील. चंद्र भ्रमण आर्थिक दृष्ट्या उत्तम फळ देईल.कुंभेचा शनी आहे. कार्य करीत रहा आणि उत्तम फळ प्राप्त करा.नवीन संधी साठी तयार रहा. संतती चिंता वाटेल.मात्र लौकर बदल होतील.अधिकारी व्यक्ती मदत करतील. सप्ताह उत्तम.

वृषभ

राशी स्वामी शुक्र शनि सोबत भाग्य स्थानात असून  अनेक धार्मिक कार्यक्रम होतील.मातृ पितृ सुख मिळेल.परदेश प्रवास होतील.राशीतील चंद्र मंगळ आर्थिक दृष्ट्या चांगले फळ देतील.कार्य क्षेत्रात नवीन संधी प्राप्त होतील. नेहमीप्रमाणे घर आणि व्यवसाय यात धावपळ होणार आहे.तरी प्रकृती जपून असावे. अश्टम स्थानातील बुध आणि व्यय राहू भ्रमित करणारे वातावरण निर्माण करतील.सप्ताह मिश्र फळ देईल.

मिथुन

राशी स्वामी बुध सप्तम स्थानात जोडीदाराची सहज साथ देईल.आयुष्य मौजमजा सहल यात आनंदात जाईल. शनि शुक्राची साथ नवीन संधी आणि परदेश गमन यासाठी उत्तम राहील.राशी चे व्यय स्थानात येणारा चंद्र खर्चिक प्रवृत्त्ती करेल.गुरू महाराज कर्म स्थान आणि सुख स्थानावर शुभ दृष्टी ठेवून आहेत .नवीन वास्तू किंवा वाहन यासाठी प्रयत्न करा.काही दिवसातच अष्टम रवि पुढे जाईल.सध्या  प्रकृतीच्या तक्रारी कडे लक्ष असू द्या.सप्ताह चांगला जाईल .

कर्क

राशी स्वामी चंद्र पूर्वार्धात उच्च अवस्थेत असणार आहे.मित्र मैत्रिणी भेट,मौज मजा यात वेळ घालवाल.आर्थिक लाभ होतील .मात्र आता शनि महाराज अष्टमात गेले आहेत.जपून रहा.कोणालाही कर्ज देणे,घेणे टाळा. प्रवास जपून करा.अतिरेकी

धाडस नको. पैशाचा अपव्यय टाळा.सध्या गुरू बळ उत्तम आहे. त्यामुळे सप्ताह उत्तम पार पडेल. शनीची उपासना सुरू ठेवा.सप्ताह शुभ.

सिंह

राशीस्वामी रवि मकरेत षष्ठात असून मातुल घराण्याशी संपर्क आणेल.शत्रू पासून सावध राहा. काही उष्णतेचे विकार त्रास देतील. गुरूबळ  नसल्याने सावध राहून कार्य करा.सप्तम शनी शुक्र व्यावसायिक ताण निर्माण करतील.मात्र काही संधी देतील.काळजीपूर्वक पुढे जा.दशम चंद्र मंगळ कार्यक्षेत्रात उत्तम फळ देणारे ठरतील.सप्ताह मध्यम.

कन्या

राशी स्वामी बुध ग्रह चतुर्थ स्थानात आहे. घरात अनेक सुधारणा, नवीन वस्तूंची खरेदी होईल.

पंचम रवि संतती साठी शुभ फळ देईल. शनि शुक्र शत्रूपासून सावध राहा असा इशारा देत आहेत. काही जुनी दुखणी डोकं वर  काढतील.वेळीच उपचार करा. अष्टमातील राहू चंद्र स्त्री रोग कारक आहेत. काळजी घ्या. सप्ताहाचा पूर्वार्ध शुभ आहे.

प्रवास योग येतील.

तुला

राशी स्वामी शुक्र शनि सोबत असून पंचम स्थानात सामाजिक  आणि कौटुंबिक बाबी  संबंधी फळ देईल. पंचम स्थानात उच्च शिक्षणाचे योग येतील. षष्ठ गुरू आणि अश्टम चंद्र मंगळ जपून राहण्याचे संकेत देत आहे. काहीसे नकारात्मक वातावरण राहिलं. उत्तरार्धात मात्र बदल होईल. भाग्य स्थानातील चंद्र मन आणि आरोग्य दोन्ही उत्तम ठेवेल. सरकारी कामकाजात यश देईल .पितृ चिंता कमी होईल.एकूण सप्ताह मिश्र फळ देईल.

वृश्चिक

राशी स्वामी मंगळाचे सप्तम स्थानात भ्रमण वैवाहिक जीवनात अस्थिरता दाखवत आहे. गैरसमज,कलह टाळा. व्यावसायिक जीवनात देखील घडामोडी होतील.चतुर्थ शुक्र शनी घरामध्ये मोठ्या सुधारणा घडवून आणेल. आई वडिलांची काळजी घ्या.संतती योग येतील. मानसिक ताण जाणवेल. शनी उपासना करावी. सप्ताह मध्यम जाईल.

धनू

राशी स्वामी गुरू चतुर्थ स्थानात आहे गृह सौख्य आणि नवीन वाहन यासाठी उत्तम फळ देईल.मातृ सुख देईल .कार्यालयीन कामकाज करण्यात यश देईल.अचानक येणाऱ्या नवीन संधी जाऊ देऊ नका.मंगळ स्वभाव तापत करेल.रक्त विकार त्रास देतील. सप्ताहाचा पूर्वार्ध जपून रहा.यावर्षी परदेश प्रवासाचे योग येऊ शकतात. वैवाहिक जीवन सुखद राहील. सप्ताह शुभ.

मकर

राशी स्वामी शनि स्वगृही असून आर्थिक ,कौटुंबिक घडामोडी होतील. तृतीय स्थानात गुरू बंधू भेट घडवेल.भावंडांच्या उत्कर्षा साठी अनुकूल काळ आहे. तसेच परदेश प्रवास घडतील.राहू मातृ सुखात कमी आणेल.स्थान बदल घडेल.कार्य क्षेत्रात जर काही बदल करायचे असतील तर हा अनुकूल काळ आहे . संतती चिंता वाटत असेल तर तिकडे लक्ष असू द्या. आरोग्य जपा. सप्ताह शुभ.

कुंभ

राशी स्वामी शनि स्वगृही शुक्र सह असून अचानक प्रवास, समारंभात सहभाग ,उत्तम खरेदी असे लाभ देईल.साडेसातीचा काळ असला तरी धन कारक गुरू आर्थिक आणि कौटुंबिक बाबीत लाभ देईल .  प्रेरणादायी विचार येतील . बोलण्याने लोकांना जिंकून घ्याल. पैतृक संपत्ती मिळेल.चतुर्थ मंगळ चंद्र घरामध्ये नवीन खरेदी घडवतील. सजावट कराल. किंवा नवीन प्रॉपर्टी चे योग येतील .एकूण सप्ताह आनंदात जाईल.

मीन

राशी स्वामी गुरू स्वराशीत असून मान सन्मान , प्रगती आणि संपत्ती यात वाढ करेल. कुटुंबात वाढ,वैवाहिक जीवनाची सुरवात ,तसेच संतती प्राप्ती करता उत्तम काळ आहे.साडे सती असली तरी घाबरु नका.परदेश गमनाची संधी येईल .व्यय शनि शुक्र आणि द्वितीय राहू घरा पासून दूर जाण्याचे योग आणतील.भावंडाना कष्ट संभवतात. सप्ताहाच्या पूर्वार्धात काळजी घ्या.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion