मुंबई, 8 जानेवारी: आज दिनांक ८ जानेवारी २०२३ वार रविवार..आज पौष कृष्ण द्वितीया. या आठवड्यातील ग्रह गोचर आणि चंद्राचे भ्रमण यावर आधारित साप्ताहिक राशी भविष्य पाहूया.
या सप्ताहात गुरू मीन राशीत असेल तर शनी मकर राशीत मार्गी अवस्थेत असून मंगळ वृषभ राशीत भ्रमण करेल .बुध आणि शुक्र मकर राशीत तर सूर्य धनू राशीत भ्रमण करेल.राहू केतू मेष व तुला राशीत आहेत. पूर्वार्धात चंद्र स्वगृही कर्केत असून धन दायक आहे . ग्रह गोचर अनुसार व लग्नानुसार साप्ताहिक भविष्य .
मेष
राशी स्वामी मंगळ वक्री स्थितीत असल्याने काहीसे संथ व निरुत्साही वातावरण आहे.राशीतील राहू देखील वर्तमान काळात प्रत्येक बाबतीत द्विधा मनस्थिती करेल. सुख स्थानात चंद्र शनीच्या प्रतियोगात आहे.त्यामुळे घरामध्ये काही ना काही कटकटी राहतील. मातृ पितृ चिंता सतावेल.
मात्र दशम स्थानातील शुक्र बुध कार्य क्षेत्रात नवीन संधी देतील. गुरू धर्म विषयक आस्था तसेच त्या क्षेत्रात अधिकारी व्यक्तीची भेट घडवून देईल.उत्तरार्ध संतती साठी शुभ समाचार आणेल.एकूण सप्ताह मिश्र फळ देणारा ठरेल. गुरू उपासना करावी.
वृषभ
राशी स्वामी शुक्र हा राजयोग कारक असून भाग्य स्थानात शनी बुधा सोबत त्रिग्रही योग निर्माण करीत आहे. राशीतील मंगळ अग्नी पासून भय तसेच स्वभावात उग्र स्वरुप आणेल. लाभ स्थानातील गुरू मित्र आणि संतती पासून फायदा करून देईल. प्रवासाचे योग येतील.बहीण भावांशी संबंध सुधारतील.तसेच संपर्क,नवीन ओळखी यापासून
फायदा होईल.तृतीय चंद्र शुभ फळ देणारा ठरेल.रागावर ताबा ठेवून हा आठवडा काळजीपूर्वक घालवावा. व्यय
राहू आणि षष्ठ केतू खर्चाचे नियोजन योग्य प्रकारे करा तसेच परदेश संबंधी व्यवहार सावध राहून करा असे आवाहन करीत आहे. सप्ताह मध्यम जाईल .
मिथुन
राशी स्वामी बुधाचे अष्टम स्थानातील भ्रमण बुद्धी भेद तसेच
डोक्या संबंधी त्रास दाखवीत आहे. अष्टम स्थानात त्रिग्रही योग जपून राहण्याचे संकेत देत आहे.घरामध्ये अतिशय खर्च होईल. नवीन वस्तूंच्या खरेदी आणि दुरुस्ती साठी पैसा टाकावा लागेल.तसेच दवाखाना आणि औषधे यावर देखील खर्च होईल कार्य क्षेत्र गुरूच्या शुभ प्रभावाखाली आहे.तिथे मात्र नवीन संधी प्राप्त होतील.वरिष्ठांची मर्जी राहील.नको तिथे धाडस करू नका.संतातीची काळजी घ्या.सप्ताहात आर्थिक लाभ मात्र भरपूर होतील. शुभ सप्ताह.
कर्क
राशी स्वामी चंद्र स्वगृही असला तरी शनी दृष्टी मुळे निराशा आणि मानसिक ताण सहन करावा लागेल.भाग्यातील गुरू
धार्मिक आस्था निर्माण करेल.तीर्थ क्षेत्राचे तसेच परदेश प्रवास घडतील.मित्र मैत्रिणीशी संबंध बिघडण्याची शक्यता आहे.जपून रहा. दशम राहू हा कार्यक्षेत्रात होणाऱ्या बदलांचा कारक आहे.योग्य निर्णय घेऊन मार्ग काढावा लागेल. आर्थिक लाभ होतील.तसेच कुटुंबात काही शुभ घटना घडतील .आयुष्यात नवीन व्यक्तीचे आगमन होण्याची शक्यता आहे.सतः चांगला जाईल.
सिंह
राशी स्वामी रवी शष्ठ स्थानात मातुल घराण्याशी संबंध दाखवीत आहे. शुक्र शनि आरोग्य विषयक तक्रारी,तसेच व्यवसाय संबंधात कर्ज ,बँकेचे व्यवहार इत्यादी घडवून आणेल.कार्य क्षेत्रात नवीन संधी मिळतील.त्याचा योग्य फायदा घ्या. अष्टम स्थानात गुरू आहे.आयुष्यात काही नावीन्य राहणार नाही.रोजचे व्यवहार नेहमीप्रमाणे करा.
फारशी अपेक्षा ठेवू नका. लौकर बदल होतील.व्यय चंद्र नुकसानि पासून सावध राहा असे सांगत आहे.सप्ताह मध्यम.
कन्या
राशी स्वामी बुध शनि सोबत काही ॲलर्जी सदृश विकार निर्माण करणार आहे. प्रकृतीची काळजी घ्या. संतती ला
देखील काही त्रास होऊ शकतात. सामाजिक जबाबदारी वाढेल.तसेच समाजात नाव होईल. अष्टम राहू आर्थिक दृष्ट्या सक्षम करेल.शेअर्स लॉटरी पद्धतीने लाभ होईल.मात्र स्त्री रोग तसेच कमरेचे त्रास होऊ शकतात.काहीही कारण नसताना हुरहूर लागून मन अस्वस्थ राहील.गुरू सर्व संकटातून मार्ग काढेल.अविवाहित व्यक्तींना योग्य जोडीदार मिळतील. सप्ताह उत्तम.
तुला
शुक्राचे चतुर्थ स्थानातील भ्रमण घरामध्ये उंची वस्तूंची खरेदी तसेच नवीन वाहन वास्तू योग दाखवीत आहे.सोबत असलेले शनी बुध काही छातीचे विकार निर्माण करतील.तपासण्या कराव्या लागतील.मातृ पितृ चिंता होईल. गुरू नोकरी आणि व्यवसाय यासाठी शुभ दायक असून मातुल घराण्या कडून शुभ वर्तमान देईल.जोडीदार निवडताना काळजी घ्या. फसवणूक टाळा.तसेच वैवाहिक जीवनात गैर समज होऊ देऊ नका.दशमातील चंद्र भ्रमण सुखद अनुभव देईल.सप्ताह उत्तम.
वृश्चिक
राशी स्वामी मंगळ सप्तम स्थानात असून जोडीदार संबंधी चिंता निर्माण करेल .भांडण टाळा.शत्रू निर्माण होतील.रक्त विकार असणाऱ्यांनी काळजी घ्या. प्रवास,बंधू भगिनी भेट आणि कला प्रकारात रुची अडा हा आठवडा आहे.अनेक नवीन व्यक्तींशी ओळख तसेच संपर्क होईल.संतती प्राप्ती साठी हा काळ शुभ आहे.भाग्य स्थानातील चंद्र पूर्वार्धा त शुभ फळ देईल.धार्मिक कार्यक्रम होतील.तसेच लांबचे प्रवास संभवतात.लाभ दायक सप्ताह आहे.
धनू
राशी स्वामी गुरू चतुर्थ स्थानात गृह सौख्य , नविन वाहन लाभ दाखवीत आहे. घरामध्ये काही सजावट,नवीन सुख सोयी करून घ्याल.पंचमातील राहू कुटुंबात वाढ सुचवीत आहे.अनेक नवीन विषयात रुची निर्माण होईल .धन स्थानातील ग्रहाधिक्य आर्थिक लाभ,तसेच कुटुंबात काही शुभ घटना दाखवीत आहे.मंगळ पराक्रमात वाढ करेल.तसेच शत्रू निर्माण करेल.पण अखेर विजय तुमचाच होईल. अष्टम चंद्र भ्रमण गैरसोयीचा आणि खर्चिक सप्ताह दाखवीत आहे.पण उत्तरार्ध अनुकूल जाईल.
मकर
राशीतील ग्रहांचे योग हे परस्पर विरोधी असले तरी शुभ फळ देतील.सर्दी खोकला तसेच त्वचा विकार सतावू शकतात.शुक्र आकर्षक व्यक्तिमत्व देईल.गंभीर स्वभावाच्या मकर राशीच्या जातकांचे कला प्रकारात लक्ष जाईल.तसेच काही शुभ घटना घडतील.तृतीय गुरू प्रवास आणि बंधुभेट घडवेल. तुमच्या संभाषण कौशल्यात विशेष वाढ होईल. वैवाहिक जीवन सुखाचे राहील. चतुर्थ मंगळ घरा संबंधी व्यवहार घडवेल.सप्ताह एकूण चांगला जाईल.शनीची उपासना करावी.
कुंभ
राशी स्वामी शनि व्यय स्थानात बुध आणि शुक्र या ग्रहा सोबत काही अनपेक्षित पेच प्रसंग निर्माण करू शकतो. आरोग्य जपा.दवाखान्याच्या फेऱ्या तसेच औषध पाण्यावर खर्च होऊ शकतो.काहीही अनाठायी धाडस करू नका.चतुर्थ मंगळ मातृ चिंता निर्माण करेल. वाद करू नका.घरात शांतता ठेवा.आर्थिक लाभ तसेच पैतृक संपत्ती यासंबंधी हा आठवडा शुभ आहे.पूर्वार्ध जपून रहा.उत्तरार्ध शुभ राहील.
मीन
राशीतील गुरू तसेच लाभ स्थानातील शुक्र आठवड्यात शुभ समाचार देतील. शनी मकर राशीत मित्र मैत्रिणी आणि वयस्क व्यक्तींकडून लाभ दाखवीत आहे.संततीची काळजी घ्या. त्यांना आवश्यक तेवढा वेळ द्या.वैवाहिक जीवन सुखाचे राहील.गुरू चंद्र नाव पंचम योग पूर्वार्ध सुखद करेल.प्रवास तसेच बंधू भेट संभवते.पण भावाला प्रकृतीचे त्रास संभवतात.पूर्वार्ध अनुकूल असून गुरू उपासना करावी शुभ सप्ताह.
शुभम भवतू !!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion