विठ्ठल भाडमुखे, प्रतिनिधी
नाशिक 30 मार्च : यंदा अधिकमास श्रावण महिना असल्यामुळे लग्नाचे मुहूर्त आहेत की नाही ? त्यामुळे लग्न होणार की नाही ? असे अनेक प्रश्न लग्नबंधनात अडकण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नवीन जोडप्यांना पडले असतील,मात्र ती काळजी करण्याची गरज नाही. यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान लग्नाचे तब्बल 37 मुहूर्त आहेत.
आपत्कालीन विवाह मुहूर्त म्हणजे काय ?
'आपत्कालीन विवाह मुहूर्त आहेत,त्याचा उल्लेख ग्रंथांमध्येही आढळतो. अधिकमास असल्यामुळे विवाह मुहूर्त नाहीत, मात्र पूर्णपणे विवाह पद्धती बंद करणे शक्य नाही. त्याचबरोबर भारतात जरी विवाह मुहूर्त काढले नाहीच तर इतर देशांमधील नागरिकांसाठी विवाह मुहूर्त काढणे आवश्यक असते. आम्ही भारतात राहत नाही तर आम्ही विवाह का करू नये? असा त्यांचा प्रश्न असतो. कौटुंबीक आणि सामाजिक बाबी लक्षात घेता विवाह मुहूर्त काढणे आवश्यक असतं, असं शास्त्रात देखील सांगण्यात आलं आहे,' अशी माहिती नाशिक येथील धर्मशास्त्राचे अभ्यासक डॉ. नरेंद्र धारणे यांनी दिली आहे.
सर्व शुभ कामांसाठी खास आहे नवरात्री, तरीही या 9 दिवसांत का होत नाही लग्न?
'चातुर्मासात लग्नाचे मुहूर्त असतात. मात्र अधिक मासात लग्नाचे मुहूर्त नसतात, कारण अधिक मासाला मलमास म्हणतात. यंदाही ऑगस्ट महिन्यात मलमास आहे त्यामुळे तो एक महिना काळामध्ये लग्नाची मुहूर्त नाहीत. इतर चार महिन्यात लग्नाचे मुहूर्त आहेत. अधिक महिन्यात लग्न करणं योग्य नाही असं प्राचीन ग्रंथांमध्ये देखील सांगण्यात आलय, मात्र काही मंडळी कौटुंबिक कारणानिमित्त किंवा सामाजिक कारणानिमित्त चांगला दिवस बघून लग्न करतात, ' असे डॉ. धारणे यांनी स्पष्ट केले.
यंदा मुहूर्त वाढले असं नाही. कौटुंबिक कारणांमुळे विवाह करणे आवश्यक आहे, असं अनेकांचं मत असतं. त्यावेळी एक चांगला दिवस निवडावा लागतो. त्या दिवशी लग्न केलं जातं. सामाजिक गरज लक्षात घेऊन पावसाळ्यात देखील मुहूर्त काढले जातात, असे डॉ. धारणे यांनी सांगितले.
2023 मधील विवाहाचे मुहूर्त
मे - ६, ८, ९, १०, ११, १५, १६,२०, २१, २२, २७, २९, ३०
जून - १, ३, ५, ६, ७, ११, १२, २३, २४, २६, २७
नोव्हेंबर - २३, २४, २७, २८, २९
डिसेंबर - ५, ६, ७, ८, ९, ११, १५
आपत्कालीन विवाह मुहूर्त कोणते?
एप्रिल - १५, २३, २४, २९, ३०
जून - ३०
जुलै - १, २, ४, ५, ९, १०,११, १४
ऑगस्ट - २२, २६, २८,२९
सप्टेंबर - ३, ६, ७, ८, १७, २४, २६
ऑक्टोबर - १६, २०, २२, २३, २४, २६
नोव्हेंबर - १, ६, १६, १८.२०,२२
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.