मराठी बातम्या /बातम्या /religion /फाल्गुन महिन्याची विनायक चतुर्थी गुरुवारी; उपासनेचे महत्त्व, पूजेचे शुभ योग जाणून घ्या

फाल्गुन महिन्याची विनायक चतुर्थी गुरुवारी; उपासनेचे महत्त्व, पूजेचे शुभ योग जाणून घ्या

फाल्गुन विनायक चतुर्थी

फाल्गुन विनायक चतुर्थी

विनायक चतुर्थीची पूजा केल्यानं गणेशाच्या कृपेने संकटे, विघ्न दूर होतात, मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्याकडून जाणून घेऊया, विनायक चतुर्थीची तिथी, उपासनेची वेळ आणि शुभ योग कोणते आहेत?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 21 फेब्रुवारी : फाल्गुन महिन्यातील विनायक चतुर्थीच्या दिवशी विघ्न दूर करणाऱ्या श्रीगणेशाची पूजा केली जाते. विनायक चतुर्थी व्रताची दिवसा पूजा केली जाते आणि या दिवशी चंद्र पाहायचा नसतो. यावेळच्या विनायक चतुर्थी व्रताच्या दिवशी सर्वार्थ सिद्धीसह चार शुभ योग तयार होत आहेत, जे कार्यात यश मिळवण्यासाठी शुभ मानले जातात. विनायक चतुर्थीची पूजा केल्यानं गणेशाच्या कृपेने संकटे, विघ्न दूर होतात, मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जाते. काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्याकडून जाणून घेऊया, विनायक चतुर्थीची तिथी, उपासनेची वेळ आणि शुभ योग कोणते आहेत?

फाल्गुन विनायक चतुर्थी 2023 -

हिंदू कॅलेंडरनुसार, विनायक चतुर्थी व्रत प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला पाळले जाते. फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 23 फेब्रुवारी रोजी पहाटे 03:24 वाजता सुरू होईल आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी 24 फेब्रुवारी, शुक्रवारी सकाळी 01:33 वाजता समाप्त होईल. गुरुवार, 23 फेब्रुवारी रोजी उदयतिथीनुसार विनायक चतुर्थी व्रत पाळण्यात येणार आहे.

विनायक चतुर्थी 2023 पूजा मुहूर्त -

23 फेब्रुवारी रोजी विनायक चतुर्थी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11.26 ते दुपारी 01.43 पर्यंत आहे. या काळात आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची विधिवत पूजा करावी.

विनायक चतुर्थीला 4 शुभ योग -

यंदा फाल्गुन विनायक चतुर्थी व्रताच्या दिवशी चार शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी सकाळपासूनच शुभ योग तयार होत आहे, जो रात्री 08:58 पर्यंत राहील. त्यानंतर शुक्ल योग सुरू होईल, जो रात्रभर चालेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत असेल. विनायक चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण काळ रवियोग राहील, तर दुसऱ्या दिवशी पहाटे 06.53 ते 03.44 पर्यंत रवियोग राहील.

विनायक चतुर्थीला चंद्र दर्शन निषिद्ध -

विनायक चतुर्थीच्या व्रतामध्ये चंद्र पाहण्यास मनाई आहे. या दिवशी चंद्र पाहिल्याने खोटा कलंक लागतो, अशी धार्मिक धारणा आहे. पौराणिक कथेनुसार, चौथचा चंद्र पाहिल्यानंतर भगवान श्रीकृष्णावर रत्न चोरल्याचा आरोप लागला होता.

हे वाचा - सोमवारी उपवास करण्याऱ्यांनी या चुका टाळा; महादेवाची कृपा नव्हे होईल अवकृपा

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Ganesh chaturthi, Religion