मराठी बातम्या /बातम्या /religion /विजया एकादशीचे व्रत-उपवास करणाऱ्यांनी जरूर ऐकावी-वाचावी ही कथा; मनोकामना होतात पूर्ण

विजया एकादशीचे व्रत-उपवास करणाऱ्यांनी जरूर ऐकावी-वाचावी ही कथा; मनोकामना होतात पूर्ण

विजया एकादशीची कथा

विजया एकादशीची कथा

काशीचे ज्योतिषी चक्रपाणि भट्ट सांगतात की, एकदा युधिष्ठिराला माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी व्रताबद्दल जाणून घ्यायची इच्छा होती, म्हणून त्याने भगवान श्रीकृष्णांना याबद्दल विचारले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 15 फेब्रुवारी : 16 फेब्रुवारीला विजया एकादशीचे व्रत गृहस्थ लोक पाळतील आणि 17 फेब्रुवारीला वैष्णवांचा उपवास असेल. विजया एकादशीच्या दिवशी उपवास आणि भगवान विष्णूची पूजा केल्यानं कार्यात यश मिळतं. कोणत्याही कठीण कामात यश मिळवायचे असेल तर विजया एकादशीचे व्रत ठेवावे आणि विष्णूची विधिवत पूजा करावी. उपासनेतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे विजया एकादशी व्रत कथा स्वतः ऐकावी किंवा वाचावी. जाणून घेऊया विजया एकादशी व्रताची कथा.

विजया एकादशी व्रताची कथा

काशीचे ज्योतिषी चक्रपाणि भट्ट सांगतात की, एकदा युधिष्ठिराला माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी व्रताबद्दल जाणून घ्यायची इच्छा होती, म्हणून त्याने भगवान श्रीकृष्णांना याबद्दल विचारले. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सांगितले की, माघ कृष्ण एकादशीला विजया एकादशी म्हणतात. विजया एकादशीचे व्रत कामात यश मिळवण्यासाठी आहे. हे व्रत केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्षही प्राप्त होतो. त्याची कथा पुढीलप्रमाणे-

एकदा नारदजींनी ब्रह्मदेवांना विजया एकादशी व्रताची पद्धत आणि महत्त्व विचारले. तेव्हा ब्रह्मदेवांनी त्यांना सांगितले की, त्रेतायुगात कैकेयीने दशरथाला रामाला वनवासात पाठवायला सांगितले, तेव्हा वडिलांच्या आज्ञेवरून श्रीराम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह 14 वर्षे वनात गेले. त्या वेळी रावणाने माता सीतेचे अपहरण केले. त्यानंतर हनुमान प्रभू रामाला भेटतात. हनुमानाच्या मदतीने वानरसेना सीतेचा शोध घेते आणि लंकेला जाण्यासाठी समुद्र पार करण्याचा मार्ग विचारात घेतला जातो.

एके दिवशी लक्ष्मणाने भगवान रामांना सांगितले की, जवळच वकदालभ्य ऋषींचा आश्रम आहे. तिथे जाऊन वकदालभ्य ऋषींना समुद्र पार करून लंकेला कसे जायचे, याचा सल्ला विचारावा. यावर श्रीराम वक्दलाभ्य ऋषींच्या आश्रमात जातात आणि ऋषींना नमस्कार करतात. समुद्र कसा पार करायचा? या समस्येच्या निराकरणासाठी त्यांच्याकडे येण्याचा हेतू स्पष्ट करतात.तेव्हा वकदालभ्य ऋषींनी सांगितले की, तुम्ही माघ कृष्ण एकादशीला विजया एकादशीचे व्रत करा आणि भगवान विष्णूची पूजा करा. तुम्ही तुमच्या अनुज, सेनापती आणि इतर महत्त्वाच्या साथीदारांसोबत हे व्रत करू शकता. हे व्रत केल्याने तुमची समस्या दूर होईल आणि तुमचा लंकेवर विजय होईल.

वकदालभ्य ऋषींच्या सूचनेनुसार श्रीरामांनी त्यांच्या सर्व मुख्य सहकाऱ्यांसह विजया एकादशीचे व्रत केले. या व्रताच्या पुण्य परिणामामुळे भगवान राम वानरसेनेसह महासागर पार करून लंकेत पोहोचले. रावणाशी घनघोर युद्ध झाले आणि रावण मारला गेला. श्रीरामाने लंका जिंकली आणि माता सीतेसोबत अयोध्येला परतले.

जो विजया एकादशीला परंपरे भक्तीभावे व्रत करतो, त्याला अत्यंत कठीण कामातही यश मिळते. ब्रह्मदेवांनी नारदजींना सांगितले होते की, विजया एकादशीचे व्रत मानवाला प्रत्येक कामात यश मिळवून देणारे आहे.

हे वाचा - शनी-सूर्य कुंभमध्ये!30 वर्षांनी महाशिवरात्रीला असा दुग्धशर्करा योग; 3 राशी जोमात

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Ashadhi Ekadashi, Religion