मुंबई, 29 मार्च : चैत्र नवरात्रीच्या 9व्या दिवशी रामनवमी हा सण साजरा केला जातो. या नियमानुसार यावर्षी 30 मार्च रोजी रामनवमी साजरी केली जाणार आहे. यावेळी रामनवमीला 5 शुभ योगांचा अनोखा मेळ निर्माण झाला आहे. राम नवमीच्या दिवशी चंद्र मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. भगवान रामाच्या कुंडलीतही चंद्र कर्क राशीत बसला आहे.
याशिवाय रामनवमीच्या दिवशी गुरु पुष्य योग, अमृत सिद्धी योग, रवियोग, सर्वार्थ सिद्धी योग अशा पाच शुभ संयोगांची निर्मिती झाल्याने या दिवशी भगवान रामाची पूजा करणे अत्यंत फलदायी ठरेल. याशिवाय बुधही या दिवशी वाढत आहे. चला तर मग जाणून घेऊया या वेळी राम नवमीला रामाची पूजा कशी करावी. जेणेकरून तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होतील.
राम नवमीचा शुभ मुहूर्त
29 मार्च रोजी शुक्ल नवमी तिथी रात्री 9.08 पासून सुरू होईल. 30 मार्च रोजी रात्री 11.31 वाजेपर्यंत नवमी तिथी असेल.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Ram Navami 2023, Rashibhavishya, Rashichakra, Religion