मराठी बातम्या /बातम्या /religion /

शुक्राच्या राशी बदलाचा या राशीच्या लोकांना होणार फायदा, दिवाळीपूर्वीच धनलाभाचे संकेत

शुक्राच्या राशी बदलाचा या राशीच्या लोकांना होणार फायदा, दिवाळीपूर्वीच धनलाभाचे संकेत

शुक्राने कन्या राशीत प्रवेश केला आहे. कन्या राशीतील शुक्राचे संक्रमण अनेक लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. दिवाळीपूर्वी हा ग्रह बदल कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 21 सप्टेंबर : कुंडलीची स्थिती आणि त्यातील ग्रह-नक्षत्र यावरून अनेक प्रकारचे योग तयार होतात. काही योग अत्यंत विलक्षण आणि फायदेशीर असतात. शुक्र ग्रह भौतिक सुखांचा कारक ग्रह मानला जातो आणि आता शुक्र ग्रह सिंह राशीतून कन्या राशीत जाईल. ज्योतिषशास्त्रानुसार, 24 सप्टेंबर रोजी शुक्राने कन्या राशीत प्रवेश केला आहे. कन्या राशीतील शुक्राचे संक्रमण अनेक लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. दिवाळीपूर्वी हा ग्रह बदल कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल? भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा याबद्दल सांगत आहेत.

- सिंह

या महिन्यात शुक्र ग्रह सिंह राशीतून कन्या राशीत जात असला तरी सिंह राशीच्या लोकांनाही यातून लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच सिंह राशीचे लोक तणावमुक्त राहतील. वैवाहिक जीवनात संतती प्राप्त होण्याचीही शक्यता आहे. व्यवसायात यश मिळू शकते आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

-कन्या

शुक्र ग्रह सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करत आहे, त्यामुळे कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ सर्वात फायदेशीर आहे. कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती वाढेल. गुंतवणुकीसाठी हा सर्वोत्तम काळ आहे. याशिवाय कन्या राशीच्या लोकांची काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासूनही सुटका होईल. करिअरमध्ये यश मिळेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगले निकाल मिळू शकतात.

हे वाचा - जेवण केल्यानंतर लगेच अंघोळ करणे योग्य आहे का? पाहा आरोग्यावर कसा होतो परिणाम

-मिथुन

या राशी परिवर्तनामुळे मिथुन राशीच्या लोकांना जमिनीशी संबंधित लाभ मिळू शकतात. याशिवाय त्यांच्याकडे पैसे मिळवण्याच्या संधीही चालून येऊ शकतात. मिथुन राशीच्या लोकांच्या मानसन्मानात वाढ होईल. आजार आणि आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल. त्यांना कार्यक्षेत्रातही भरीव यश मिळू शकते.

हे वाचा - ऑनलाइन फसवणूक, वीजबिल, बँकेचं काम, प्रॉपर्टी वाद, घरगुती भांडण.. कायदेशीर उत्तर

-कर्क

कन्या राशीतील शुक्राच्या परिवर्तनामुळे कर्क राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो. त्यांच्याकडे अनेक माध्यमातून पैसे येण्याची शक्यता आहे. जुने कर्ज चालू असेल तर त्यातून सुटका होऊ शकते. करिअरमध्ये वेळ चांगला असून प्रमोशनच्या संधी मिळू शकतात.

First published:

Tags: Rashibhavishya, Rashichark