मराठी बातम्या /बातम्या /religion /बेडरूममध्ये अजिबात लावू नका अशा प्रकारची पेंटिंग, वैवाहिक जीवनात येईल वादळ

बेडरूममध्ये अजिबात लावू नका अशा प्रकारची पेंटिंग, वैवाहिक जीवनात येईल वादळ

कोणतेही काम वास्तुविरुद्ध असेल तर त्याचे नकारात्मक परिणाम दिसून येतात.

कोणतेही काम वास्तुविरुद्ध असेल तर त्याचे नकारात्मक परिणाम दिसून येतात.

कोणतेही काम वास्तुविरुद्ध असेल तर त्याचे नकारात्मक परिणाम दिसून येतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 19 जानेवारी: बहुतांशपणे वास्तुशास्त्रानुसार घराचे बांधकाम केले जाते. संपूर्ण घरासाठी वास्तूची भूमिका महत्त्वाची मानली गेली आहे. कोणतेही काम वास्तुविरुद्ध असेल तर त्याचे नकारात्मक परिणाम दिसून येतात. आज आपण वास्तू या विषयावर घरात करावयाच्या पेंटिंगबद्दल बोलणार आहोत. लोकांना त्यांच्या घराच्या हॉल, बेडरूम, डायनिंग रुममध्ये फोटो लावायला खूप आवडतं. वास्तूनुसार घरात लावलेल्या चित्रांचाही घरातील ऊर्जेवर विशेष प्रभाव पडतो. बेडरूममध्ये कोणतीही पेंटिंग किंवा चित्रे ठेवताना विशेष काळजी घ्यावी. कधी-कधी आपण अशी पेंटिंग्ज बेडरुममध्ये ठेवतो जे सुंदर दिसतात, पण वास्तुशास्त्रानुसार ते योग्य मानल्या जात नाहीत.

वास्तूनुसार या पेंटिंगचा पती-पत्नीच्या नात्यावर वाईट परिणाम होतो. जाणून घेऊया बेडरूममध्ये कोणत्या प्रकारची पेंटिंग्ज वापरू नयेत.

1. भूतांशी संबंधित चित्र बेडरूममध्ये कधीही लावू नये. यामुळे घरात नकारात्मक शक्ती वाढते.

2. बेडरूममध्ये काळी मांजर, घुबड किंवा सापाचे चित्र कधीही लावू नका. हे वैवाहिक जीवनासाठी शुभ मानले जात नाहीत.

3. शयनगृहात युद्धाचे पेंटिंगदेखील लावू नये. अशी पेंटिंग घरातील त्रास वाढवण्याचे काम करतात. असे चित्र लावल्याने पती-पत्नीमध्ये वाद निर्माण होतात, असे मानले जाते.

4. वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये एकाच प्राण्याचे किंवा माणसाचे पेंटिंग लावू नये. त्यामुळे तुमच्या आयुष्यात एक प्रकारचा एकटेपणा निर्माण होतो.

5. वास्तुनुसार बेडरूममध्ये अग्निशी संबंधित पेंटिंगदेखील लावू नये. आग हे विनाशाचे प्रतीक मानले जाते. असे म्हटले जाते की हे बेडरूममध्ये ठेवल्याने पती-पत्नीमध्ये रागाची भावना वाढते.

6. शयनकक्षात दिवंगत पूर्वजांचे चित्र लावल्याने पती-पत्नीच्या मनात अशांतता निर्माण होते.

7. वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये पाण्याच्या घटकाचा फोटो लावणेदेखील टाळावे. असे मानले जाते की यामुळे पती-पत्नीच्या नात्यात स्थिरता येत नाही.

8. बेडरूममध्ये जंगली प्राण्याचे पेंटिंग किंवा कोणताही फोटो लावू नका. त्यांच्या प्रभावामुळे पती-पत्नीमध्ये रागाची भावना वाढते.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion, Vastu