मराठी बातम्या /बातम्या /religion /

Vastu : या दिवशी नवीन चप्पल-शूज खरेदी करणं, घालणं का अशुभ मानलं जातं?

Vastu : या दिवशी नवीन चप्पल-शूज खरेदी करणं, घालणं का अशुभ मानलं जातं?

चप्पलचा संबंध शनी ग्रहाशी मानला जातो, कोणत्या दिवशी शूज-चप्पल खरेदी करावी आणि कोणत्या दिवशी खरेदी करू नये, याविषयी काही नियम/श्रद्धा मानल्या जातात.

चप्पलचा संबंध शनी ग्रहाशी मानला जातो, कोणत्या दिवशी शूज-चप्पल खरेदी करावी आणि कोणत्या दिवशी खरेदी करू नये, याविषयी काही नियम/श्रद्धा मानल्या जातात.

चप्पलचा संबंध शनी ग्रहाशी मानला जातो, कोणत्या दिवशी शूज-चप्पल खरेदी करावी आणि कोणत्या दिवशी खरेदी करू नये, याविषयी काही नियम/श्रद्धा मानल्या जातात.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 21 सप्टेंबर : वास्तुशास्त्र नियम पाळल्यास व्यक्तीचे जीवन सुलभ बनते. अशा अनेक वस्तू आहेत, ज्या विशिष्ट दिवशी किंवा वेळी खरेदी करणे निषिद्ध मानले जाते. अनेकदा आपले वडीलधारे आपल्याला या गोष्टींबद्दल थांबवतात, पण बरेच लोक त्या गोष्टींना नकार देत पुढे जातात. याचा परिणाम असा होतो की, सर्व काही सुरळीत होऊनही आयुष्यात समस्या येऊ लागतात आणि त्यामागील कारण आपल्याला समजत नाही. आपण करत असलेल्या खरेदीशी आपले नशीब आणि दुर्दैव देखील जोडलेले असते. त्यापैकी एक बाब म्हणजे शूज आणि चप्पल खरेदी करणे. कोणत्या दिवशी शूज-चप्पल खरेदी करावी आणि कोणत्या दिवशी खरेदी करू नये, याविषयी इंदूरचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा सांगत आहेत. कोणत्या दिवशी खरेदी करू नये - वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या खरेदी करण्यास मनाई आहे. त्यापैकी एक म्हणजे पादत्राणे. प्रत्येक व्यक्ती आपल्या सोयीनुसार आणि गरजेनुसार पादत्राणे खरेदी करतो. परंतु, वास्तुशास्त्रानुसार अमावस्या, मंगळवार, शनिवार किंवा ग्रहणाच्या दिवशी शूज-चप्पल खरेदी करणे टाळावे. त्यामुळे अमंगळ मागे लागते, अडचणी वाढतात, असे मानले जाते. या दिवशी पादत्राणे का खरेदी करू नयेत - ज्योतिष शास्त्रानुसार शनीचा संबंध पायाशी आहे, असे मानले जाते. त्यामुळे शनिवारी शूज आणि चप्पल खरेदी करू नये, असे सांगितले जाते. शनिवारी शूज आणि चप्पल खरेदी केल्यास शनिदोष व्यक्तीवर चढतो. यामुळे शनिदेव क्रोधित होतात आणि घरात दुःख, गरिबी येते. कोणत्या दिवशी नवीन चप्पल खरेदी करायची किंवा घालायची - नवीन शूज आणि चप्पल खरेदी करण्यासाठी आणि परिधान करण्यासाठी योग्य दिवसाबद्दल देखील वास्तुशास्त्रात सांगितले आहे. शुक्रवारी नवीन शूज आणि चप्पल खरेदी करणे आणि शुक्रवारी नवीन शूज-चप्पल घालणे सर्वोत्तम आहे, असे मानतात. हे वाचा -  कोणतंही रत्न धारण करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी, फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं कोणत्या दिवशी खराब-जुने शूज फेकावे- वापरात नसलेले किंवा फाटलेले जुने जोडे आणि चप्पल फेकून देण्याचाही उल्लेख वास्तुशास्त्रात आहे. मान्यतेनुसार, जुने शूज आणि चप्पल शनिवारी कोणत्याही शनि मंदिराबाहेर ठेवाव्यात. या उपायाने माणूस शनिच्या वाईट प्रभावापासून वाचतो. येथे शूज-चप्पल ठेवू नका - वास्तुशास्त्रानुसार ज्या पलंगावर तुम्ही झोपत असता त्याखाली शूज आणि चप्पल ठेवू नयेत. असे केल्याने पलंगावर झोपलेल्या व्यक्तीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि पती-पत्नीच्या नात्यात दुरावाही येतो. हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Lifestyle, Religion

पुढील बातम्या