मराठी बातम्या /बातम्या /religion /

खूप मेहनत करूनही फळ मिळत नसेल तर असू शकतो वास्तुदोष, असा ओळखा प्रॉब्लेम

खूप मेहनत करूनही फळ मिळत नसेल तर असू शकतो वास्तुदोष, असा ओळखा प्रॉब्लेम

सहज होणारी कामंही अनेकदा बिघडायला लागतात किंवा मेहनत करूनही यश मिळत नसेल तर ते वास्तुदोषाचे लक्षण असू शकते. यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात याविषयी जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 25 ऑगस्ट : वास्तुशास्त्राला आपल्या जीवनात विशेष महत्त्व आहे. घरात ठेवलेल्या छोट्या-छोट्या गोष्टींचा आपल्या जीवनावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे वास्तूनुसार गोष्टी योग्य ठिकाणी योग्य दिशेने ठेवाव्यात असे सांगितले जाते. अनेकदा आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, ज्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात. वास्तुदोषामुळे आपल्या जीवनात अनेक समस्या येऊ लागतात, पण प्रश्न असा आहे की वास्तू दोष ओळखून तो दूर कसा करता येईल? पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्या मते वास्तुदोष दूर करणे आवश्यक आहे. काही गोष्टींद्वारे आपण वास्तुदोष (Vastu Tips) शोधू शकतो.

होता-होता काम रखडणे -

सहज होणारी कामंही अनेकदा बिघडायला लागतात किंवा मेहनत करूनही यश मिळत नसेल तर ते वास्तुदोषाचे लक्षण असू शकते. घराचा मध्यभाग हा ब्रह्मस्थान असतो. त्यामुळे या ठिकाणी कोणतीही जड वस्तू ठेवू नये, तसेच मध्यवर्ती भागात शौचालये बांधू नयेत. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा राहते, त्यामुळे प्रत्येक कामात अडथळा निर्माण होत जातो.

कष्ट करूनही पैसा येत नाही -

सतत आणि मेहनत करूनही आर्थिक स्थिती सुधारत नसेल तर घरात वास्तुदोष असण्याची शक्यता असते. वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य दिशेला वास्तुदोष असल्यास धनप्राप्तीमध्ये अडचण येते. अशा परिस्थितीत घराच्या मुख्य दरवाजाची किंवा खिडकीची दिशा बदलण्याचा सल्ला दिला जातो.

हे वाचा -  नखांच्या आकारावरूनही समजतं स्वभाव आणि बरंच काही, या टिप्स वापरून ओळखा

आरोग्य समस्या -

घरातील लोक वारंवार आजारी पडत असतील तर ते वास्तू दोषामुळे देखील असू शकते. वास्तूनुसार आग्नेय दिशेला वस्तूंची दिशा योग्य नसल्यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहत नाही. अशा स्थितीत वास्तू उपायांनी ही दिशा दुरुस्त करावी.

हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान

(सूचना : येथे दिलेली माहिती वास्तुशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Religion, Vastu