मराठी बातम्या /बातम्या /religion /

Vastu Tips : आरसा तुमचं नशीब बदलू शकतो; वास्तुशास्त्रानुसार या योग्य दिशांनाच लावा

Vastu Tips : आरसा तुमचं नशीब बदलू शकतो; वास्तुशास्त्रानुसार या योग्य दिशांनाच लावा

घरामध्ये वस्तू ठेवण्यासाठी योग्य दिशा माहीत नसल्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. सर्वांच्याच घरात असणाऱ्या आरशाच्या वास्तु नियमाविषयी इंदूरचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा माहिती देत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 01 सप्टेंबर : वास्तुशास्त्राची निर्मिती ब्रह्मदेवाने मानवाच्या कल्याणासाठी केली, असे मानले जाते. आजच्या आधुनिक युगातही लोक घर बांधताना वास्तुशास्त्राचे नियम पाळतात आणि एखाद्या चांगल्या वास्तु तज्ज्ञाच्या सल्ल्याने घर बांधून घेतात, परंतु काही वेळा सावधगिरी बाळगूनही घरात नकारात्मक ऊर्जा राहते. ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात अडचणी येतात, तसेच चिंता आणि तणाव निर्माण होतो. वास्तूनुसार घर बांधले जाते, परंतु घरामध्ये वस्तू ठेवण्यासाठी योग्य दिशा माहीत नसल्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. सर्वांच्याच घरात असणाऱ्या आरशाच्या वास्तु नियमाविषयी इंदूरचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा माहिती देत आहेत.

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये आरसा लावण्याची योग्य दिशा -

वास्तुशास्त्राव्यतिरिक्त ज्योतिष शास्त्रातही असे मानले जाते की, घरात आरसा योग्य दिशेला लावणे खूप महत्त्वाचे आहे. वास्तूनुसार आरसा नेहमी घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावा. असे मानले जाते की, योग्य दिशेला लावलेला आरसा घरात सुख, शांती आणि आर्थिक प्रगती करतो. याशिवाय आरसा योग्य दिशेला लावल्याने समाजात घरातील सदस्यांचा मान-सन्मान वाढतो.

वास्तुशास्त्रानुसार आरशाचा आकार कसा असावा?

वास्तुशास्त्रानुसार घरातील आरशाचा आकार नेहमी चौकोनी ठेवावा. तसेच घरात बसवलेला आरसा नेहमी स्वच्छ असावा, ज्यामध्ये तुम्हाला तुमचा चेहरा स्पष्ट दिसावा. घरामध्ये बसवलेला आरसा घाण होऊ नये आणि त्यामध्ये धुसर दिसत असेल तर तो लगेच बदलावा.

हे वाचा -  नखांच्या आकारावरूनही समजतं स्वभाव आणि बरंच काही, या टिप्स वापरून ओळखा

घरामध्ये तुटलेला आरसा नसावा -

वास्तुशास्त्रात सांगितले आहे की, आपण कधीही घरात तुटलेला आरसा ठेवू नये. असे मानले जाते की घरात तुटलेला आरसा ठेवल्याने नकारात्मकता वाढते. घरातील सदस्यांसाठीही ते शुभ नाही. घरात बसवलेला आरसा तुटला किंवा थोडासाही तडा गेला तर तो लगेच बदलायला हवा.

हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान

(सूचना : येथे दिलेली माहिती वास्तुशास्त्रावर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Religion, Vastu