मराठी बातम्या /बातम्या /religion /

तुमच्या खिशातलं पाकिट नशीब बिघडवू शकतं, पहिल्यांदा न चुकता हे काम करा

तुमच्या खिशातलं पाकिट नशीब बिघडवू शकतं, पहिल्यांदा न चुकता हे काम करा

काहींचे पाकिट एकतर रिकामे असते किंवा पाकिटात पैसे टिकत नाहीत. अशा परिस्थितीत अनेकजण आपल्या नशिबाला दोष देतात. मात्र, प्रत्यक्षात त्याचं कारण वेगळंच असू शकतं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 05 ऑक्टोबर : जीवनात पैशाला खूप महत्त्व आहे. यासाठी लोक खूप कष्ट करतात, पण अनेकांना रात्रंदिवस मेहनत करूनही पैसा मिळत नाही. यामुळे जीवनात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. काहींचे पाकिट एकतर रिकामे असते किंवा पाकिटात पैसे टिकत नाहीत. अशा परिस्थितीत अनेकजण आपल्या नशिबाला दोष देतात. मात्र, प्रत्यक्षात त्याचं कारण वेगळंच असू शकतं. ज्योतिष शास्त्रात पाकिटाबद्दल काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने आयुष्यात पैशाची कमतरता भासू लागते. जाणून घेऊया पाकिटाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी.

फाटलेले पाकिट -

पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, अनेक लोक वर्षानुवर्षे एकच पाकिट/पर्स वापरतात. पाकिट फाटल्यानंतरही ते बदलत नाहीत. पण, असे करणे अशुभ मानले जाते. फाटलेल्या पाकिटामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर क्रोधित होऊ शकते. यामुळे आयुष्यात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो, त्यामुळे आपल्या खिशातील पाकिट नेहमी स्वच्छ आणि नवीन असावे.

भरलेले पाकिट -

ज्योतिष शास्त्रानुसार पर्समध्ये अनावश्यकपणे कागद भरून ठेवू नये. काही लोक खूप जुनी कागदपत्रे, कार्ड पर्समध्ये ठेवतात, ज्याचा कदाचित काही उपयोगही नसतो. त्यामुळे पाकिटात पैसे ठेवायलाही जागा राहत नाही. यासाठी पाकिटाची वेळोवेळी स्वच्छता केली पाहिजे. काही लोक पाकिटामध्ये अश्लील साहित्य देखील ठेवतात, जे शुभ मानले जात नाही. शास्त्रानुसार पैसे ठेवण्याची जागा स्वच्छ असावी शिवाय अश्लील साहित्य कधीही पाकिटामध्ये ठेवू नये.

हे वाचा - मंदिरात दिवा लावताना या छोट्या गोष्टी कायम लक्षात ठेवा, मनोकामना होतात पूर्ण

देवाची चित्रे -

काही लोक पाकिचामध्ये देव-देवतांची चित्रे ठेवतात, जी काही दिवसांनी खराब होतात किंवा फाटतात. अशी चित्रे पाकिटात राहिल्याने घरात गरिबी येते आणि जीवनात पैशाची कमतरता भासते. त्यामुळे असे करू नये.

First published:

Tags: Religion, Vastu