मराठी बातम्या /बातम्या /religion /

Vastu Tips: अशा गोष्टी स्टोअर रूम, किचनमध्ये कधीच ठेवू नयेत, नाहक अडचणी वाढत जातात

Vastu Tips: अशा गोष्टी स्टोअर रूम, किचनमध्ये कधीच ठेवू नयेत, नाहक अडचणी वाढत जातात

अशा गोष्टी बहुतेक आपल्या स्वयंपाकघर आणि स्टोअर रूममध्ये आढळतात. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा सांगत आहेत अशा वस्तूंबद्दल, ज्या किचन आणि स्टोअर रूममध्ये ठेवू नयेत.

अशा गोष्टी बहुतेक आपल्या स्वयंपाकघर आणि स्टोअर रूममध्ये आढळतात. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा सांगत आहेत अशा वस्तूंबद्दल, ज्या किचन आणि स्टोअर रूममध्ये ठेवू नयेत.

अशा गोष्टी बहुतेक आपल्या स्वयंपाकघर आणि स्टोअर रूममध्ये आढळतात. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा सांगत आहेत अशा वस्तूंबद्दल, ज्या किचन आणि स्टोअर रूममध्ये ठेवू नयेत.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 01 ऑगस्ट: आपल्या घरात अशा अनेक गोष्टी असतात, ज्या अनावश्यक ठेवल्या जातात. दैनंदिन जीवनात या गोष्टी फार काळ वापरल्या जात नाहीत, त्यामुळे या वस्तू काढून टाकण्याऐवजी आपण स्टोअर रूममध्ये ठेवतो. वास्तुशास्त्रानुसार, घरात ठेवलेल्या अशा वस्तू नशिबासाठी मारक ठरू शकतात. वास्तुशास्त्रानुसार, ज्या वस्तू आपण दीर्घकाळ वापरत नाही, त्यामध्ये शनि आणि राहू वास करतात. त्यामुळे आपल्या जीवनात संकटे येऊ (Vastu Tips) लागतात. अशा गोष्टी बहुतेक आपल्या स्वयंपाकघर आणि स्टोअर रूममध्ये आढळतात. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा सांगत आहेत अशा वस्तूंबद्दल ज्या किचन आणि स्टोअर रूममध्ये ठेवू नयेत. स्टोअर रूम किंवा किचनमध्ये या गोष्टी कधीही ठेवू नका - पितळी भांडे आजच्या युगात प्रत्येकजण आपल्या घरात स्टेनलेस स्टीलची भांडी वापरतो. अशा स्थितीत जवळपास प्रत्येक घरात जुन्या पद्धतीच्या पितळी भांड्यांचा वापर संपला आहे. अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात जुनी पितळेची भांडी ठेवली असतील आणि तुम्ही ती बऱ्याच काळापासून वापरली नसतील, तर अशी भांडी लवकरात-लवकर घरातून काढावीत. स्टोअर रुम आणि किचनमध्ये ठेवूच नये. असे मानले जाते की पितळेच्या भांड्यांमध्ये शनि देवाचा वास दीर्घकाळ असतो. - गंजलेल्या गोष्टी अनेकवेळा आपण आपल्या घरात अशी जुनी लोखंडी साधने ठेवतो, जी बऱ्याच काळापासून वापरली जात नाहीत, स्टोअर रूममध्ये ठेवतात आणि ही साधने गंजत राहतात. असे मानले जाते की ही गंजलेली उपकरणे घरात ठेवल्याने घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते. हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर -शिवणकामाचे यंत्र पूर्वी लोक कपडे शिवण्यासाठी शिलाई मशिन वापरत असत, पण हळूहळू शिलाई मशीनचा वापर बंद होत आहे. अशा परिस्थितीत अनेकांच्या घरात स्टोअर रूममध्ये ठेवलेले शिलाई मशीन खराब होत जाते, त्यामुळे तुमच्या घरातही बंद शिलाई मशीन पडलेले असेल तर ते लवकरात-लवकर घराबाहेर काढा. राहू आणि शनि हे बंद शिलाई मशीनमध्ये वास करतात, असे मानले जाते. - लॉक केलेली घड्याळे आपल्यापैकी बरेच जण आपल्या घरातील भिंतीवरील घड्याळ, मनगटी घड्याळ स्टोअर रूममध्ये ठेवतात. असे केल्याने घरातील सदस्यांसाठी दुर्दैवी परिस्थिती निर्माण होऊ शकते. घराच्या कोणत्याही दिशेला बंद घड्याळ लावल्यास त्याचा परिणाम घरातील सदस्यांच्या जीवनावर होतो. त्यामुळे बंद घड्याळ कधीही घरात ठेवू नये. हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Lifestyle, Vastu

पुढील बातम्या