मराठी बातम्या /बातम्या /religion /

जेवायला बसताना चुकूनही या चुका करू नका; निघून जाईल घरातील सुख-समृद्धी

जेवायला बसताना चुकूनही या चुका करू नका; निघून जाईल घरातील सुख-समृद्धी

वास्तुशास्त्रात दैनंदिन कामाबाबतही अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यापैकी एक म्हणजे अन्न खाणे, अन्न खाताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

वास्तुशास्त्रात दैनंदिन कामाबाबतही अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यापैकी एक म्हणजे अन्न खाणे, अन्न खाताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

वास्तुशास्त्रात दैनंदिन कामाबाबतही अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यापैकी एक म्हणजे अन्न खाणे, अन्न खाताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 27 सप्टेंबर : मानवजातीच्या समस्यांवर मात करण्यासाठी ब्रह्मदेवाने विश्वाच्या निर्मितीसह वास्तुशास्त्राची रचना केली, असे मानले जाते. वास्तुशास्त्रात सांगितलेले नियम नीट पाळले तर माणसाचे जीवन सुखी होते. वास्तुशास्त्रात मुख्यत्वे दिशा सांगितल्या आहेत. याशिवाय वास्तुशास्त्रात दैनंदिन कामाबाबतही अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यापैकी एक म्हणजे अन्न खाणे, अन्न खाताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत.

अन्न खाताना या चुका टाळा -

वास्तुशास्त्रात दिशांना खूप महत्त्व दिले आहे. वास्तूमध्ये सांगितले आहे की अन्न खाताना व्यक्तीने नेहमी उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करून बसावे. याशिवाय जर एखाद्या व्यक्तीने दक्षिण दिशेला तोंड करून अन्न खाल्ले तर त्याचा आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो.

जर तुमच्या घरात डायनिंग टेबल असेल आणि तुम्ही त्यावर जेवत असाल तर वास्तुशास्त्रानुसार डायनिंग टेबल कधीही रिकामा ठेवू नये. ताजी फळे, मिठाई किंवा खाद्यपदार्थ नेहमी त्यावर ठेवावेत. असे मानले जाते की यामुळे घरात समृद्धी येते.

वास्तुशास्त्रानुसार अंथरुणावर बसून कधी जेवू नये, त्यामुळे गंभीर आजारांना आमंत्रण मिळू शकते. हे पूर्णपणे वास्तुशास्त्राच्या विरुद्ध आहे. असे मानले जाते की पलंगावर/अंथरुणावर बसून अन्न खाल्ल्याने व्यक्तीचे ऋण वाढते आणि पैशाशी संबंधित समस्या उद्भवतात.

जर तुम्हाला जेवणात वरून मीठ खाण्याची आवड असेल आणि खाल्ल्यानंतर तुमचे मीठ ताटात उरले तर ते असेच फेकून देऊ नये. तुम्ही त्यात थोडे पाणी टाकू शकता. मीठ टाकणे किंवा मीठ दान केल्याने घरात दारिद्र्य येऊ शकते. यासोबतच घरातील अंतर्गत वादाचे कारणही बनते.

रात्रीचे जेवण झाल्यावर खरखटी भांडी कधीही स्वयंपाकघरात ठेवू नका. असे केल्याने माता अन्नपूर्णा आणि देवी लक्ष्मीचा अपमान होतो आणि त्या क्रोधित होतात असे मानले जाते. अशा स्थितीत तुमच्या घरात धनहानी होण्याची शक्यता असते.

हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Religion, Vastu