मराठी बातम्या /बातम्या /religion /

घरामध्ये आर्थिक समृद्धी राहण्यासाठी काय करावं? जाणून घ्या फेंगशुईमध्ये दिलेला उपाय

घरामध्ये आर्थिक समृद्धी राहण्यासाठी काय करावं? जाणून घ्या फेंगशुईमध्ये दिलेला उपाय

मराठी वास्तुशास्त्र टिप्स

मराठी वास्तुशास्त्र टिप्स

आर्थिक प्रगतीसाठी लोक घरात मनी प्लांट लावतात. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मनी प्लांट ठेवल्यानं आर्थिक समृद्धी होते. असं म्हणतात की, ज्या घरात मनी प्लांटचं रोप असेल, तिथे पैशाची कमतरता नसते.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 25 नोव्हेंबर : प्रत्येकालाच भरपूर पैसे कमवावे असं वाटतं. ज्या घरामध्ये सुख, शांती व आर्थिक समृद्धी अर्थात पैसा असतो, अशा घरातील व्यक्ती नेहमीच आनंदी असते. घरामध्ये आर्थिक संपत्ती असावी, यासाठी वास्तुशास्त्रात वेगवेगळे उपाय सांगितले आहेत. त्यामध्ये एक म्हणजे मनी प्लांट घरात लावणं. पण तुम्हाला माहिती आहे का, वास्तू आणि फेंगशुईमध्ये अशा पाच वनस्पती सांगण्यात आल्या आहेत ज्या मनी प्लांटपेक्षा जास्त शुभ आहेत. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलंय.

आर्थिक प्रगतीसाठी लोक घरात मनी प्लांट लावतात. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये मनी प्लांट ठेवल्यानं आर्थिक समृद्धी होते. असं म्हणतात की, ज्या घरात मनी प्लांटचं रोप असेल, तिथे पैशाची कमतरता नसते. पण वास्तुशास्त्र आणि फेंगशुईमध्ये अशा पाच वनस्पती सांगण्यात आल्या आहेत, ज्या मनी प्लांटपेक्षा जास्त शुभ आहेत. आज आम्ही तुम्हाला त्या पाच वनस्पतींची माहिती देणार आहोत. या घरात ठेवल्यानं आर्थिकदृष्ट्या खूप फायदा होतो, अशी मान्यता आहे.

रुई

रुईची पानं व फांद्या तोडल्यावर त्यातून दुधासारखा पांढरा पदार्थ निघतो. या वनस्पतीला भगवान गणेशाचं प्रतीक मानलं जातं. हे रोप घरात ठेवणं वास्तुशास्रामध्ये खूप शुभ मानलं जातं. रुईचं रोप घरात ठेवल्यानं सुख, शांती आणि समृद्धी मिळते. आर्थिक समृद्धी आणि प्रगतीसाठी हे खूप चांगलं मानलं जातं.

कण्हेर

तुम्ही एखाद्या उद्यानात किंवा बागेत कण्हेरीचं रोप पाहिलं असेल. या वनस्पतीच्या तीन प्रजाती आहेत, ज्यामध्ये लाल, पांढरी आणि पिवळी फुलं येतात. कण्हेरीचं पांढरं फूल देवी लक्ष्मीला अर्पण केलं जातं. घरामध्ये कण्हेरीच्या फुलाचा पसरलेला सुगंध दारिद्र्य दूर करतो, आणि समृद्धी आणतो, असं म्हणतात.

जेड प्लांट

अनेक लोकांच्या घरांच्या छतावर आणि बाल्कनीमध्ये ठेवलेलं जेडचं रोप तुम्ही पाहिलं असेल. फेंगशुईमध्ये या वनस्पतीला खूप चमत्कारिक म्हटलं जातं. असं म्हटलं जातं की, ही वनस्पती घरात धनसंपत्तीला आकर्षित करते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते, आणि नकारात्मकता दूर होते.

दुर्वा (दूब)

वास्तुशास्त्रानुसार ज्या घरांमध्ये गार्डन, टेरेस किंवा बाल्कनीमध्ये दुर्वा (दूब) लावलेल्या असतात, त्या घरांमध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही. घरासमोर दुर्वा लावण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. दुर्वा घरासमोर लावणं अपत्यप्राप्तीसाठी शुभ मानलं जातं. घरात नेहमी सुख-शांतीचे वातावरण असतं.

तुळस

घरात तुळशीचं रोप ठेवणं खूप शुभ असतं. तुळस ही देवी लक्ष्मीचं रूप असल्याचं सांगितलं जातं. ज्या घरात तुळशीचं रोप असतं, तिथे श्रीहरि भगवान विष्णूची कृपा सदैव राहते. तुळशीचं रोप घरी असल्यास आरोग्यासाठी फायदा तर होतोच, शिवाय संपत्ती कधीही कमी पडत नाही, अशी मान्यता आहे.

घरामध्ये पैसा, सुख, समृद्धी राहावी यासाठी वास्तुशास्त्रात विविध उपाय सांगितले आहेत. त्यामध्ये शुभ फल देणाऱ्या वनस्पतींचा समावेशसुद्धा आहे.

वाचा - हनुमानाची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Vastu