मुंबई, 01 फेब्रुवारी : वास्तुशास्त्रामध्ये घरात असलेल्या वस्तू आणि त्यांच्या ठेवण्याच्या स्थितीला विशेष महत्त्व दिलं जातं. वास्तुशास्त्रानुसार, घरात असलेल्या प्रत्येक वस्तूची स्वतःची नकारात्मक, सकारात्मक ऊर्जा असते, ज्याचा प्रभाव घरात राहणाऱ्या लोकांवरही पडतो. सकारात्मक उर्जा मिळत राहिल्यास घरातील सदस्यांची प्रगती होते, पण वास्तुदोष असेल तर घरातील प्रत्येक काम बिघडू लागते. वास्तुदोषांमुळे व्यक्तीचे आर्थिक नुकसान तर होतंच पण शारीरिक आणि मानसिक समस्यांनाही सामोरं जावं लागतं. वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या देव्हाऱ्यात असणे शुभ मानले जाते. याविषयी भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी सांगितलेली माहिती पाहुया.
घरातील देव्हाऱ्यात या चार वस्तू असाव्यात -
शंख -
हिंदू धर्मात शंख होईपर्यंत कोणतीही पूजा पूर्ण मानली जात नाही. ज्या घरामध्ये नियमितपणे शंख वाजविला जातो, तेथे कोणतीही नकारात्मक ऊर्जा उरत नसते, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरातील पूजास्थानी/देव्हाऱ्यात शंख ठेवला पाहिजे आणि पूजेदरम्यान देखील त्याचा वापर करावा. मान्यतेनुसार, संगम वापरल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते.
मोरपंख -
हिंदू धर्मात मोराच्या पंखाला वेगळे महत्त्व आहे. मोराचे पंख हे भगवान श्रीकृष्णाच्या आवडत्या वस्तूंपैकी एक आहे. वास्तुशास्त्रामध्ये असे मानले जाते की, पूजेच्या ठिकाणी मोराची पिसे ठेवल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते, तसेच भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद प्राप्त होतो, त्यामुळे आपल्या घराच्या देव्हाऱ्यात मोराची पिसे नेहमी ठेवावीत.
गंगाजल -
हिंदू धर्मग्रंथांमध्ये गंगाजल अत्यंत पवित्र मानले जाते. असे मानले जाते की गंगा ही पृथ्वीवरील मोक्षदायिनी नदी आहे, त्यामुळे गंगा नदीचे पवित्र पाणी घराच्या पूजास्थानी ठेवावे. धार्मिक मान्यतेनुसार देवी-देवतांवर गंगा नदीचे पाणी शिंपडल्यास त्यांचे आशीर्वाद लवकर प्राप्त होतात. गंगाजल कधीही खराब होत नाही, त्यामुळे तुम्ही ते तुमच्या देव्हाऱ्यात जास्त काळ ठेवू शकता.
शाळीग्राम -
शाळीग्राम हा भगवान विष्णूचा अवतार मानला जातो. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील पूजास्थानी शाळीग्राम ठेवणे खूप शुभ असते. यासोबतच त्याची नियमित पूजा केल्यास श्री हरी विष्णूसोबत लक्ष्मीही प्रसन्न होते.
हे वाचा - Shiv Mantras: महादेवाची पूजा करताना या मंत्रांचा करा जप; पूर्ण होतील सर्व मनोकामना
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.