मराठी बातम्या /बातम्या /religion /रस्त्यावर सापडलेले पैसै खर्च करावे की नाही? वास्तुशास्त्रात सांगितलंय त्याचं उत्तर

रस्त्यावर सापडलेले पैसै खर्च करावे की नाही? वास्तुशास्त्रात सांगितलंय त्याचं उत्तर

रस्त्यावर सापडलेल्या पैशांचे काय करावे

रस्त्यावर सापडलेल्या पैशांचे काय करावे

प्रत्येक व्यक्तीसोबत कधी ना कधी असे घडलेच असेल की, चालताना वाटेत पडलेले पैसे सापडले असतील. ते नाणे असेल किंवा नोट असू शकते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 02 एप्रिल : प्रत्येक व्यक्तीसोबत कधी ना कधी असे घडलेच असेल की, चालताना वाटेत पडलेले पैसे सापडले असतील. ते नाणे असेल किंवा नोट असू शकते. असे पैसे सापडतात तेव्हा अनेकांच्या मनात एक संभ्रम निर्माण होतो की, या पैशाचे करायचे काय? काही लोक ते उचलतात आणि स्वत:कडेच ठेवतात. तर काही लोक गरज असलेल्यांना ते देतात किंवा मंदिरात दान करतात. पण, अनेकांना प्रश्न पडतो की, रस्त्यावर पडलेले पैसे उचलायचे का? रस्त्यावर पडलेले पैसे उचलणे शुभ की अशुभ? याविषयी भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.

रस्त्यावर पडलेले पैसे सापडणे चांगले की वाईट?

रस्त्यावर पडलेले पैसे सापडणे विशेषत: नाणी सापडणे खूप शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, रस्त्यावर पडलेले नाणे सापडणे म्हणजे तुम्हाला तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद असल्याचा तो संकेत. अशा परिस्थितीत तुम्ही कोणतेही काम पूर्ण मेहनतीने केले तर त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. चीनमध्ये पैसे किंवा नाण्यांकडे केवळ व्यवहाराचा एक भाग म्हणून पाहिले जात नाही, तर ते सौभाग्याचे प्रतीकही मानले जाते.

- वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी कुठेतरी जात असाल आणि त्या वेळी तुम्हाला वाटेत एखादे नाणे किंवा नोट पडलेली दिसली, तर ते तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळण्याचे लक्षण आहे.

-जर तुम्ही कामावरून घरी परतत असाल, तर तुम्हाला वाटेत पैसे पडलेले दिसले, तर तुम्हाला लवकरच आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत.

जर तुम्हाला रस्त्यावर काही पैसे पडलेले आढळले तर ते मंदिरात दान करा किंवा तुम्ही ते तुमच्या पर्समध्ये किंवा घरात कुठेतरी ठेवू शकता, परंतु वास्तूशास्त्रानुसार ते खर्च करू नये.

जर तुम्हाला वाटेत पडलेले नाणे सापडले तर तो एक शुभ संकेत मानावा. तुम्ही लवकरच नवीन काम सुरू करू शकता आणि हे काम तुम्हाला यश आणि पैसा दोन्ही देऊ शकते.

हे वाचा - रामचरितमानसच्या या ओव्यांमध्ये दिव्य शक्ती; रामाची होईल कृपा, वाढेल आत्मविश्वास

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Money, Religion, Vastu