मराठी बातम्या /बातम्या /religion /

बेडरूममध्ये उशाशेजारी या गोष्टी कधीही ठेवू नयेत; वैवाहिक जीवनात वाढतात अडचणी

बेडरूममध्ये उशाशेजारी या गोष्टी कधीही ठेवू नयेत; वैवाहिक जीवनात वाढतात अडचणी

बेडरुम वास्तुशास्त्र

बेडरुम वास्तुशास्त्र

Bedroom Marathi Vastu Tips: बेडरुममध्ये बेडच्या डोक्याकडील बाजूला उशाशी काही वस्तू ठेवू नयेत, याचा वैवाहिक जीवनावर परिणाम होतो आणि पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 29 नोव्हेंबर : वास्तुशास्त्र हा मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. वास्तुशास्त्रात सुख, शांती, आशीर्वाद आणि आनंदी जीवनासाठी अनेक प्रकारचे उपाय सांगण्यात आले आहेत. घरात कोणतीही वस्तू ठेवण्याचे वास्तु नियम आहेत. घरात सर्वत्र वस्तू ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतात, ज्यामुळे समस्या निर्माण होतात. पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, काही वस्तू बेडरूममध्ये ठेवणे वास्तूनुसार शुभ मानले जात नाही. त्यामुळे झोपेचा त्रास होतो आणि वैवाहिक जीवनात दुरावा येऊ लागतो. जाणून घेऊया बेडरुममध्ये ठेवलेल्या कोणत्या वस्तूंमुळे नकारात्मक प्रभाव पडतो.

या गोष्टी उशाशी ठेवू नका -

बेडरुममध्ये बेडच्या डोक्याकडील बाजूला उशाशी काही वस्तू ठेवू नयेत, याचा वैवाहिक जीवनावर परिणाम होतो आणि पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होतात. वास्तू नियमांनुसार बेडच्या डोक्याजवळ खलबत्ता चुकूनही ठेवू नये, यामुळे वैवाहिक नात्यात तणाव निर्माण होतो.

त्याचप्रमाणे पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे किंवा कागदपत्रे कधी उशाजवळ ठेवू नयेत. यामुळे घरात नकारात्मकता येते आणि जीवनात सुख-शांतीचा अभाव राहतो.

बाटली, पर्स, तेल नकारात्मकता वाढवतात -

वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये डोक्याजवळ पाण्याची बाटली, तेल ठेवणे शुभ मानले जात नाही. यामुळे चंद्रदेव नाराज होतात आणि तसे करणाऱ्या लोकांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्याचप्रमाणे पर्स/पाकिट कधी डोक्याशेजारी किंवा उशीखाली ठेवू नये. त्यामुळे आर्थिक सुबत्तेत अडथळे निर्माण होऊन पैशाची कमतरता भासते. काही लोक बेडरूममध्येच शूज आणि चप्पल काढतात, जे वास्तुनुसार योग्य नाही. यामुळे जीवनात नकारात्मक ऊर्जा येते.

या गोष्टी लक्षात ठेवा

वास्तू नियमांनुसार घरामध्ये वस्तू योग्य ठिकाणी ठेवाव्यात. घराच्या उत्तरेला, पूर्वेला फर्निचर ठेवणे शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे टीव्ही, फ्रीज सुद्धा उत्तर-पश्चिम दिशेला ठेवावे. उत्तर किंवा पूर्व दिशेला आरसा लावणे देखील शुभ असते, यामुळे घरात सुख-समृद्धी आणि शांती राहते आणि जीवनात आनंद टिकून राहतो.

वाचा - हनुमानाची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Vastu