मराठी बातम्या /बातम्या /religion /

किचनची जागाच नव्हे तर रंगही आहे महत्त्वाचा; तुमच्या घरात नांदेल सुख आणि शांतता

किचनची जागाच नव्हे तर रंगही आहे महत्त्वाचा; तुमच्या घरात नांदेल सुख आणि शांतता

किचनमधील रंगाचा संपूर्ण घरावर होतो परिणाम. (प्रतीकात्मक फोटो)

किचनमधील रंगाचा संपूर्ण घरावर होतो परिणाम. (प्रतीकात्मक फोटो)

स्वयंपाकघराची रंगसंगतीही उत्साहित करणारी, ताजंतवानं वाटेल अशी असावी. वास्तुरचनेनुसार काही रंगसंगती स्वयंपाकघरासाठी उत्तम ठरतात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 24 ऑगस्ट : उदरभरण हे शरीरासाठी महत्त्वाचं असतं. तसंच उदरभरणासाठी लागणारं अन्न तयार होणारी घरातली जागा अर्थात स्वयंपाकघरही (Kitchen) घरातील महत्त्वाची खोली असते. स्वयंपाकघरात काम करणाऱ्या व्यक्तीचं मन प्रसन्न आणि आनंदी राहिलं तरच पदार्थांमध्ये तो भाव, प्रेम उतरतं. पर्यायानं घरातल्या व्यक्तींचं आरोग्य ठीक राहतं. त्यामुळेच स्वयंपाकघराची रचना वास्तुतज्ज्ञांचा (Vastu Tips For Kitchen Color) सल्ला घेऊन करावी. तसंच स्वयंपाकघराची रंगसंगतीही उत्साहित करणारी, ताजंतवानं वाटेल अशी असावी. वास्तुरचनेनुसार काही रंगसंगती स्वयंपाकघरासाठी उत्तम ठरतात.

हिरवा रंग

हिरवा रंग शांतता (Peace) आणि ऐक्याचं (Harmony) प्रतीक असतो. यामुळे स्वयंपाकघरात गेल्यावर एक सुखकारक अनुभूती मिळते. हिरवा रंग निसर्गाचंही प्रतीक असतो. स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या भाज्या व पदार्थ हिरव्या रंगाचे असतात. निसर्गात जशी शांतता आणि सौख्य नांदतं, त्याचप्रमाणे ते आपल्या स्वयंपाकघरातही नांदावं, यासाठी हिरवा रंग स्वयंपाकघरात लावावा.

केशरी रंग

केशरी रंग सकारात्मकता (Orange For Positivity), नातेसंबंध आणि घरातील वातावरण चांगलं ठेवण्यास मदत करतो. हा रंग शक्ती आणि धैर्याचं प्रतीक असतो. त्यामुळे स्वयंपाकघरासाठी हा रंग चांगला असतो. आग्नेय दिशेला असणाऱ्या स्वयंपाकघरासाठी या रंगाचं कॉम्बिनेशन वापरणं हिताचं ठरतं.

हे वाचा - Vastu Tips: अशा गोष्टी स्टोअर रूम, किचनमध्ये कधीच ठेवू नयेत, नाहक अडचणी वाढत जातात

गुलाबी रंग

गुलाबी रंग प्रेमाचं (Pink Is For Love) प्रतीक असतो. घरातील सदस्यांमध्ये प्रेम, जिव्हाळा राहावा, यासाठी स्वयंपाकघराला गुलाबी रंग द्या. वास्तुरचनेनुसार गुलाब रंग शक्ती, ताकद दर्शवणारा असतो. कुटुंबियांमध्ये जिव्हाळ्याचे नातेसंबंध निर्माण करण्यासाठी हा रंग मदत करतो.

पांढरा रंग

पांढरा रंग निरागसपणा आणि शुद्धता (White Is Pure) दर्शवतो. स्वयंपाकघराला हलका रंग द्यायचा असेल, तर पांढरा रंग उत्तम असतो. स्वयंपाकघर वायव्य दिशेला तोंड करून असेल, तर त्याला पांढरा रंग देणं फायदेशीर असतं.

पिवळा रंग

स्वयंपाकघरात काम करताना उत्साही (Yellow Denotes Energy) वाटणं जरूरीचं असतं. हा उत्साह व आनंद पिवळा रंग देतो. स्वयंपाकघरासाठी हा रंग सगळ्यात उत्तम असतो. यामुळे घरातील वातावरण आनंदी आणि उबदार राहतं.

हे वाचा - Vastu Tips: किचनच्या वास्तुशास्त्रात या गोष्टी आहेत महत्त्वाच्या, अडचणी वाढण्याचं कारण बनतं ते

प्रत्येक रंगाचं स्वतःचं असं वैशिष्ट्य असतं. त्यानुसार घरातील वातावरणावर व सदस्यांवर बरे-वाईट परिणाम होत असतात. स्वयंपाकघर ऊर्जेचं स्थान असतं. त्यामुळे स्वयंपाकघराचा रंग घराच्या दृष्टीनं उपयुक्त ठरेल यासाठी वास्तुरचनेची मदत घेता येते. वास्तूरचनेनुसार स्वयंपाकघराला कोणता रंग द्यावा हे ठरवता येतं. त्यामुळे घरात चैतन्य निर्माण होतं. कुटुंबातील सदस्यांचं आरोग्य चांगलं राहतं.

First published:

Tags: Lifestyle, Religion, Vastu