मराठी बातम्या /बातम्या /religion /

घरात घोड्याची मूर्ती/ फोटो या दिशेला ठेवल्याने वाढते सुख-समृद्धी; मिळतात शुभवार्ता

घरात घोड्याची मूर्ती/ फोटो या दिशेला ठेवल्याने वाढते सुख-समृद्धी; मिळतात शुभवार्ता

 घर किंवा ऑफिसमध्ये घोड्याची मूर्ती योग्य दिशेला ठेवल्यास सकारात्मक परिणाम मिळतात. घोड्याची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवणे योग्य आहे ते जाणून घेऊया.

घर किंवा ऑफिसमध्ये घोड्याची मूर्ती योग्य दिशेला ठेवल्यास सकारात्मक परिणाम मिळतात. घोड्याची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवणे योग्य आहे ते जाणून घेऊया.

घर किंवा ऑफिसमध्ये घोड्याची मूर्ती योग्य दिशेला ठेवल्यास सकारात्मक परिणाम मिळतात. घोड्याची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवणे योग्य आहे ते जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 24 सप्टेंबर : वास्तुशास्त्राला आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. वास्तुशास्त्राच्या मदतीने आपण जीवनातील त्रास कमी करू शकतो आणि काही नियम पाळून घरातील सुख-शांती परत मिळवू शकतो. वास्तुशास्त्रानुसार घर किंवा ऑफिसमध्ये वस्तू व्यवस्थित केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतात. घरात सकारात्मक ऊर्जा राहते. मेहनत करूनही काम होत नसेल किंवा यश मिळत नसेल तर वास्तुशास्त्राच्या उपायांचा अवलंब करावा.

पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, फेंगशुई वास्तू नियमानुसार, जीवनात नशीब बदलवण्यासाठी घोड्याची मूर्ती खूप प्रभावी आहे. घर किंवा ऑफिसमध्ये घोड्याची मूर्ती योग्य दिशेला ठेवल्यास सकारात्मक परिणाम मिळतात. घोड्याची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवणे योग्य आहे ते जाणून घेऊया.

घोड्याच्या मूर्तीचे फायदे -

फेंगशुईशास्त्रानुसार घरातील कलह, घरातील लोकांचे वारंवार आजारपण, व्यवसायात मंदी इत्यादी समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी घोड्याची मूर्ती लावणे शुभ असते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. आनंद आणि समृद्धी प्रवेश करते. व्यवसायातही चांगला नफा राहतो.

या दिशेला ठेवा मूर्ती -

शास्त्रानुसार घोड्याची मूर्ती/फोटो घराच्या उत्तर दिशेला ठेवणे शुभ असते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. कुटुंबात शांती आणि आनंदाचे वातावरण राहते. त्याचबरोबर व्यवसायात नफा मिळवण्यासाठी दुकानात किंवा कार्यालयात उत्तर दिशेला घोड्याची मूर्ती बसवावी. त्याचबरोबर समाजात मान-सन्मान वाढावा, यासाठी मूर्ती दक्षिण दिशेला ठेवावी.

हे वाचा -  कोणतंही रत्न धारण करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी, फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं

या गोष्टी लक्षात ठेवा -

शयनगृहात (बेडरूम) घोड्याची मूर्ती ठेवू नये. त्यामुळे दाम्पत्यामध्ये वाद होऊ शकतो. मूर्ती/फोटोतील घोड्याचा लगाम लावलेला नसावा याची काळजी घ्या. घरामध्ये मूर्तीचे तोंड मुख्य दरवाजाकडे राहील, अशा पद्धतीने ठेवावे.

हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Religion, Vastu