मराठी बातम्या /बातम्या /religion /

कामधेनु गाईची प्रतिमा घरात लावल्याने मिळतात अनेक फायदे, योग्य दिशा-नियम समजून घ्या

कामधेनु गाईची प्रतिमा घरात लावल्याने मिळतात अनेक फायदे, योग्य दिशा-नियम समजून घ्या

कामधेनू गाईची मूर्ती किंवा प्रतिमा घरात ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात आणि कुटुंबात सौभाग्य-प्रेम टिकून राहते, असे मानले जाते. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून जाणून घेऊया कामधेनू गाईची मूर्ती कशी बसवायची.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 12 ऑगस्ट : वास्तुशास्त्र जीवनात खूप महत्त्वाचे मानले जाते. वास्तूनुसार घर खरेदी करण्यापासून ते घरात वस्तू व्यवस्थित ठेवण्यापर्यंत अनेक नियम आहेत. वास्तू नियमांनुसार वस्तू योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेला ठेवल्या तर जीवनात सुख-समृद्धी मिळू शकते. वास्तुशास्त्रानुसार कामधेनू गायीची मूर्ती घरी ठेवणे शुभ मानले जाते. कामधेनू गाईच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते. कामधेनू गाईची मूर्ती ठेवल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि कुटुंबात सौभाग्य आणि प्रेम टिकून राहते, असे मानले जाते. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून जाणून घेऊया कामधेनू गाईची मूर्ती कशी बसवायची. कामधेनू गाईची मूर्ती अशा प्रकारे घरात ठेवा - योग्य दिशेला असणे आवश्यक - कामधेनू गाईची मूर्ती वास्तु नियमानुसार योग्य दिशेला ठेवावी. वास्तूनुसार कामधेनू गायीची मूर्ती ईशान्य दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. या दिशेला कामधेनू गाईची मूर्ती स्थापित केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि कुटुंबात सुख-शांती नांदते. हे वाचा -  Rakshabandhan 2022: यंदाच्या राखीपौर्णिमेला भद्रकाल; वाचा कधी आणि कसं साजरं करावं रक्षाबंधन या ठिकाणी मूर्ती ठेवा - कामधेनू गायीला वैश्विक गाय असेही म्हणतात. कामधेनू गाय ज्या घरात बांधली जाते त्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते, असे म्हणतात. हिंदू धर्मात कामधेनूची मूर्ती आपल्या पूजेच्या ठिकाणी ठेवावी. ही मूर्ती तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरही ठेवू शकता. यामुळे घरात सुख-शांती राहील. हे वाचा - Rakshabandhan 2022 : आणखी खास बनवा रक्षाबंधन; भावंडांना पाठवा हे सुंदर शुभेच्छा संदेश या प्रकारची मूर्ती घरात ठेवा - वास्तुशास्त्रानुसार कामधेनू गायीची मूर्ती कोणत्याही धातूमध्ये बसवता येते. घरामध्ये सोन्याची किंवा चांदीची मूर्ती बसवलीच पाहिजे असे नाही. हवी असल्यास तांब्याची किंवा पितळी मूर्तीही ठेवू शकता किंवा सामान्य कामधेनूचे चित्रही लावू शकता. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Lifestyle, Vastu

पुढील बातम्या