मुंबई, 12 नोव्हेंबर : स्वच्छतेचे महत्त्व ज्योतिष आणि वास्तुशास्त्रातही सांगितले आहे. घर स्वच्छ असेल तर घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो. घराच्या स्वच्छतेमध्ये पाणी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावते. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा सांगत आहेत पाण्याचे असे काही प्रयोग जे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर करणे फायदेशीर ठरू शकते. वास्तुशास्त्रानुसार पाणी शिंपडणे चांगले मानले जाते. घरासमोर पाणी शिंपडणे अनेक प्रकारे फायदेशीर आहे. पाण्याच्या काही धार्मिक उपायांबद्दल जाणून घेऊया.
तांब्याचा कलश -
वास्तुशास्त्रानुसार सकाळी लवकर उठून स्नान करून घराच्या मुख्य दरवाजावर नियमितपणे तांब्याच्या कलशात पाणी घेऊन शिंपडावे. हा उपाय केल्याने घरात धन-समृद्धी टिकून राहते. याशिवाय घरातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते. त्याचबरोबर घरातून नकारात्मक ऊर्जा जाऊन सकारात्मक ऊर्जा वाढते.
हळद मिश्रित पाणी -
वास्तुशास्त्रानुसार घराच्या उंबरठ्यावर हळद मिसळलेले पाणी शिंपडणे खूप शुभ मानले जाते. सकाळी उठून स्नान इ. करून तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात 1 चिमूट हळद मिसळा. हे पाणी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला शिंपडावे. या उपायाने आजूबाजूचे वातावरण निरोगी राहते तसेच घरात धन-संपत्तीची कमतरता भासणार नाही.
मीठ पाणी -
वास्तुशास्त्रानुसार आठवड्यातून एकदा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मिठाचे पाणी शिंपडावे. मिठात नकारात्मकता दूर करण्याची क्षमता असते. याशिवाय खारट पाणी शिंपडून सर्व रोग, दोष, शोक इत्यादी दूर ठेवता येतात.
वाचा - हनुमानाची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.