मराठी बातम्या /बातम्या /religion /

Vastu Tips : झोपण्यापूर्वी करा फक्त हे काम; लक्ष्मी होईल प्रसन्न, दूर होतील सर्व आर्थिक समस्या

Vastu Tips : झोपण्यापूर्वी करा फक्त हे काम; लक्ष्मी होईल प्रसन्न, दूर होतील सर्व आर्थिक समस्या

काही छोट्या-छोट्या वास्तु टीप्स फॉलो केल्यास घरामध्ये ऐश्वर्य, शांती आणि समृद्धी येते असे मानले जाते. यासोबतच घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो आणि घरातून नकारात्मक ऊर्जाही संपते.

काही छोट्या-छोट्या वास्तु टीप्स फॉलो केल्यास घरामध्ये ऐश्वर्य, शांती आणि समृद्धी येते असे मानले जाते. यासोबतच घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो आणि घरातून नकारात्मक ऊर्जाही संपते.

काही छोट्या-छोट्या वास्तु टीप्स फॉलो केल्यास घरामध्ये ऐश्वर्य, शांती आणि समृद्धी येते असे मानले जाते. यासोबतच घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो आणि घरातून नकारात्मक ऊर्जाही संपते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 28 नोव्हेंबर : वास्तू शास्त्रात घाराची ठेवण कशी असावी आणि कुठली गोष्ट कुठे असावी हे सांगितले आहे. वास्तूशास्त्रात सांगितलेल्या अनेक गोष्टी थेट माणसाच्या स्वभावावर आणि जीवनावर परिणाम करतात असे मानले जाते. घरात सुख-समृद्धी नांदावी यासाठी वास्तूची विशेष काळजी घेतली पाहिजे. वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारची पूजा-पाठ केले जातात.

काही छोट्या-छोट्या वास्तु टीप्स फॉलो केल्यास घरामध्ये ऐश्वर्य, शांती आणि समृद्धी येते असे मानले जाते. यासोबतच घरामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो आणि घरातून नकारात्मक ऊर्जाही संपते. जाणून घेऊया वास्तूनुसार झोपण्यापूर्वी कोणते काम केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात.

मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी पूजेसाठी हे प्रभावी मंत्र; जप केल्यानं वाढेल पुण्य

रात्री झोपण्यापूर्वी करा हे उपाय

मोहरीच्या तेलाचा दिवा : 'आज तक'च्या रिपोर्टनुसार मोहरीच्या तेलाचा दिवा रात्री झोपण्यापूर्वी दक्षिण दिशेला लावावा. कारण या दिशेला पितरांचा वास असतो. या दिशेला दिवा लावल्याने पित्र प्रसन्न होतात आणि कुटुंबाला सुख-समृद्धीचे आशीर्वाद देतात. तुम्हाला रात्रभर दिवा लावणे शक्य नसेल तर संध्याकाळी दिवा लावा आणि त्यानंतर या दिशेला छोटा बल्ब लावा.

मंदिरात दिवा लावा : रात्री झोपण्यापूर्वी मंदिरात तुपाचा दिवा अवश्य लावावा. देवघरात रोज तुपाचा दिवा लावल्याने घरावर देवी लक्ष्मीची सदैव कृपा राहते आणि आर्थिक स्थिती मजबूत होते असे मानले जाते. वास्तूशास्त्रानुसार मंदिरात कधीही अंधार ठेवू नये.

कापूर जाळा : वास्तुशास्त्रानुसार झोपण्यापूर्वी थोडा कापूर जाळून त्याचा धूर बेडरूममध्ये आणि संपूर्ण घरात पसरू द्यावा. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते असे मानले जाते. यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतात.

मुख्य दरवाजा ठेवा स्वच्छ : रात्री झोपण्यापूर्वी घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करावा. घराच्या मुख्य दरवाजासमोर शूज आणि चप्पल ठेऊ नये. कारण देवी लक्ष्मी मुख्य दरवाजातूनच घरात प्रवेश करते असे मानले जाते.

स्वप्नात सूर्य, चंद्र आणि इंद्रध्वज दिसणं आहे शुभ; पाहा काय सांगते भविष्य पुराण

घराचे कोपरे स्वच्छ करा : वास्तू शास्त्रानुसार घराचा प्रत्येक कोपरा खूप महत्त्वाचा मानला जातो. दररोज रात्री घराची ईशान्य आणि उत्तर दिशा स्वच्छ करून झोपावे असे मानले जाते. कारण या कोपऱ्यात कुबेरजींचा वास असतो अशी धार्मिक श्रद्धा आहे.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:

Tags: Lifestyle, Religion, Vastu