मुंबई, 03 फेब्रुवारी : नवविवाहित जोडपे असो की जुने जोडपे, त्यांच्यात काही गोष्टींवरून भांडणे होतात. एखाद्या गोष्टीवर असहमत असणे, हे याचे कारण असू शकते. परंतु वारंवार आणि कोणतेही कारण नसतानाही वाद घडू लागतात तेव्हा आपण विचार करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही एकदा तुमच्या झोपेची दिशा बघावी. वास्तुशास्त्रानुसार, जोडपे चुकीच्या दिशेने झोपले तर त्याचा परिणाम त्यांच्या नात्यावर होतो. दुरावा, पराकोटीची स्थिती अशा परिस्थितीत निर्माण होऊ लागते.
वास्तुशास्त्रानुसार, पलंगाची स्थिती, त्याचा रंग आणि बेडरूममध्ये वापरल्या जाणार्या वस्तू विवाहित जोडप्यांसाठी खूप महत्त्वाच्या असतात. सुखी वैवाहिक जीवनासाठी वास्तुदोषांपासून मुक्ती मिळणे अत्यंत आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की, विवाहित जोडप्यांनी योग्य दिशेला डोके-पाय करून झोपल्याने जीवन साथीदाराचे संरक्षण, प्रेम आणि आपलेपणाची भावना मजबूत होते. याविषयी भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया.
विवाहित जोडप्यांना झोपण्याची योग्य दिशा
वास्तुशास्त्रानुसार, विशेषत: विवाहित जोडप्यांनी कोणत्या दिशेला डोके करून झोपावे, याविषयी दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही दिशेला डोके करून झोपल्यानं त्याचा वैवाहिक जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो. वास्तुशास्त्र सांगते की, झोपताना पती-पत्नीचे डोके दक्षिण दिशेला आणि पाय उत्तर दिशेला असतील तर त्यांचे वैवाहिक जीवन सुखी राहते. सामान्यतः असे मानले जाते की अशा प्रकारे झोपल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही.
पलंग कोणत्या दिशेला ठेवावा -
वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशेला झोपण्यासाठी जोडप्याच्या बेडरूमचा पलंगही योग्य दिशेला असणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही तुमचा पलंग योग्य दिशेला लावाल, तेव्हा तुमची झोपण्याची स्थिती आणि दिशाही योग्य राहील. वास्तुशास्त्रानुसार दाम्पत्याचा पलंग नैऋत्य दिशेला ठेवावा आणि पाय नेहमी उत्तरेकडे ठेवून झोपावे. सुखी वैवाहिक जीवनासाठी ही गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
पलंगावर कोणत्या बाजूला झोपावं?
वास्तुशास्त्रानुसार पती-पत्नीच्या झोपेची दिशी महत्त्वाची आहे, परंतु याशिवाय पतीने पलंगाच्या कोणत्या बाजूला झोपावे आणि कोणत्या बाजूला झोपू नये, हे देखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सुखी वैवाहिक जीवन हवे असेल तर या गोष्टीही ध्यानात ठेवू शकता. वास्तुशास्त्रानुसार पतीने पलंगाच्या उजव्या बाजूला आणि पत्नीसाठी पलंगाच्या डाव्या बाजूला झोपणे शुभ असते. असे केल्याने पती-पत्नीच्या नात्यात नेहमी प्रेम आणि गोडवा राहतो, असे मानले जाते.
हे वाचा - या 2 दिवशी घरात अगरबत्ती न लावलेलीच बरी! भोगावे लागतील हे अशुभ परिणाम
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.